esakal | विकास दुबेच्या भावासह मामाचा एन्काउंटर; पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

बोलून बातमी शोधा

Family Of Vikas Dubey, Killed Vikas Dubeys Brother

दोघांच्या नातेवाईकांना त्यांचा खात्मा केल्यानंतर सूचना देण्यात आली होती. पण....

विकास दुबेच्या भावासह मामाचा एन्काउंटर; पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कानपूरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरु  केलेल्या शोधमोहिमेत  विकास दुबेचा मामा आणि चुलत भाऊ यांचा खात्मा करण्यात आला. यासंदर्भात पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली होती. दोघांच्या शवविच्छेदनानंतर कोणीही त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास आले नाही. त्यामुळे पोलिसांनीच भैरोघाटस्थित विद्युत शवदाह गृहात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. विकासचा मामा प्रेमप्रकाश उर्फ प्रेमकुमार पांडेय आणि चुलत भाऊ अतुल दुबे यांचा खात्मा केल्यानंतर त्यांचा पंचनामा करुन व्हिडिओग्राफीसह शवविच्छेदन करण्यात आले. बिल्होरचे पोलिस निरीक्षक संतोष अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या नातेवाईकांना त्यांचा खात्मा केल्यानंतर सूचना देण्यात आली होती. भैरोघाटवर कुटुंबियांची प्रतिक्षा करण्यात आली. जवळपास सायंकाळी साडेचारपर्यंत त्यांची वाट पाहिल्यानंतर अखेर पोलिस कर्मचाऱ्यांनीच दोघांच्या मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार केले.  विकास दुबेचा मामा प्रेमप्रकाश याच्या छातीत आणि पोटात तीन गोळ्या लागल्या होत्या. शनिवारी शवविच्छेदनात त्याचा खुलासा झाला. अतुल दुबेच्या मानेच्या खाली छाती, पोट आणि कंबर या शरीराच्या भागात आठ ते नऊ गोळ्या लागल्या होत्या. 

ते पोलिस ओरडून सांगत होते, आम्हाला जीवे मारुन तुम्ही वाचणार नाही!

उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये एका अधिकाऱ्यासह 8 पोलिसांची हत्या झाली होती. या प्रकरणी आरोपी असलेला कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलिस शोध घेत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दुबेला पकडण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. 19 वर्षांपूर्वी विकास दुबे याने राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची पोलिस स्टेशनमध्ये घुसून हत्या केली होती. दुबेने पोलिसांसमोर शुक्ला यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, खुद्द पोलिसांनी दुबे विरोधात साक्ष दिली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली होती. आता याच दुबेने एका पोलिस उपअधीक्षकासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केली आहे. 2000 मध्ये कानपूरच्या शिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्येप्रकरणातही त्याच्यावर आरोप झाले होते.  विकास दुबे याच्या विरोधात 60 पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर कारवाईला वेग आला असून विकास दुबेच्या मामासह भावाचा खात्मा करण्यात आलाय. 

'राजकारणानं उद्धवस्त केलं, त्याला मारून टाका'; विकास दुबेच्या आईची भावना

पोलिसांच्या कारवाईची भनग लागल्यानंतर पूर्ण तयारीनिशी घरात लपलेल्या टोळक्याने पोलिसांवर घराच्या छतावरुन गोळीबार केला होता. यावेळी पोलिस पथकाकडून त्यांना सूचना देण्यात आल्या. आमच्यावर गोळीबार करुन तुम्ही वाचणार नाही, असे पोलिसांवर गोळीबार करण्यात आला होता. राजकारणामुळे विकास दुबेचे आयुष्य उद्धवस्त झाल्याचे सांगत खुद्द आईनेही त्याला संपवा, अशी भावना व्यक्त केली होती.