'राजकारणानं उद्धवस्त केलं, त्याला मारून टाका'; विकास दुबेच्या आईची भावना

वृत्तसंस्था
Friday, 3 July 2020

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बिकरु गावात 8 पोलिसांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी असणाऱ्या विकास दुबे याचा पोलिस शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर दुबे याच्या आईने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बिकरु गावात 8 पोलिसांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी असणाऱ्या विकास दुबे याचा पोलिस शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर दुबे याच्या आईने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. तो राजकारणामुळे उद्धवस्त झाला आहे. त्याला अनेकांनी पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली होती. आता त्याला पाहता क्षणी मारुन टाका, असं त्या म्हणाल्या आहेत.

आताच घरी पोलिस येऊन गेले. विकासने काय कृत्य केले हे त्यांनी सांगितलं. त्याला मारुन टाका. त्याने दुसऱ्यांची आत्मा दु:खी केली आहे. आता त्यालाही मारुन टाकायला हवं. पण विकास पूर्वी असा नव्हता. आम्ही त्याला शिक्षणासाठी पीपीएन कॉलेजमध्ये घातलं होतं. त्याची एअरफोर्समध्ये आणि नंतर नेव्हीमध्ये नोकरी लागणार होती. त्याला या गाववाल्यांनी आणि राजकारणाने उद्धवस्त करुन टाकले. तो सुरुवातील 5 वर्षे भारतीय जनता पक्षामध्ये होता. कारण हरिकिशन त्या पक्षात होते. नंतर हरिकिशन बहुजन समाज पक्षात(बीएसपी) गेल्यानंतर तोही तिकडे गेला. त्यानंतर तो पाच वर्ष समाजवादी पक्षात(एसपी) होता, असं विकास दुबे याच्या आईने सांगितलं आहे.

विकास दुबेनं तुरुंगात असताना जिंकली होती निवडणूक, आता पोलिसांवर केला मोठा हल्ला
आरोपींच्या शोधात पोलिस

चौबेपुरमध्ये गुरुवारी रात्री गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एका पोलिस उपाधीक्षकासह 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शिवाय 5 पोलिस कर्मचारी, एक होमगार्ड जवान आणि एक सामान्य नागरिक यात जखमी झाले आहेत. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन गुन्हेगारांना मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी झालेल्या चकमकीनंतर गुन्हेगारांनी पोलिसांचे शस्त्र काढून घेतले होते. यात एके 47 राइफल, एक इंसास राइफल, एक ग्लार्क पिस्तुल आणि दोन नाईन एमएमच्या पिस्तुलांचा समावेश आहे. शुक्रवारी मारण्यात आलेल्या एका गुन्हेगाराजवळ पोलिसांकडून काढून घेतलेली काही शस्त्र सापडली आहेत. अजून काही गुन्हेगार मोकाट आहेत. पोलिस एसटीएफ यांच्यासोबत आरोपींचा शोध घेत आहेत. 

भारतातून 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्दच, फक्त या विमानांना परवानगी
विकास दुबेची गुन्हेगारी पार्श्वभूमी

पोलिस ठाण्यात घुसून संतोष शुक्ला यांची हत्या केल्याचा आरोप असतानाही पुरावा नसल्याच्या कारणामुळे विकास दुबेला न्यायालयाने निर्दोष सोडले होते. पोलिसांनीही विकास विरोधात साक्ष दिली नव्हती.  2000 मध्ये कानपूरच्या शिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्येप्रकरणातही त्याच्यावर आरोप झाले होते. याचवर्षी रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. 2004 मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे याची हत्या झाली होती. यातही विकास दुबेचा हात असल्याचे बोलले जाते. 2013 मध्ये त्याच्यावर गंभीर आरोप झाले.  विकास दुबे याच्या विरोधात 60 पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vikas dube mother said politics destroyed him kill my son