दिल्ली - उकाड्यापासून किंचित दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update heat wave
दिल्ली - उकाड्यापासून किंचित दिलासा

दिल्ली - उकाड्यापासून किंचित दिलासा

नवी दिल्ली : गेले काही दिवस असह्य उकाड्याने होरपळणाऱया राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात आज अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना किंचित दिलासा मिळाला. येत्या ५ मे पर्यंत दिल्लीसह हरियाणा आदी राज्यांत हलका पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.

दिल्लीत गेले काही दिवस असह्य उकाडा होता. तप्त वाफेच्या झळांमुळे (लू) चोवीस तास दिल्लीकर असह्य उकाड्याने त्रस्त झाले होते. आज पहाभाटे राजधानी परिक्षेत्राच्या वातावरणात किंचित बदल झाला तो जाणवण्याइतपत होता. सकाळी दिल्लीच्या काही भागांत ढगाळ वातावरण होते. येत्या ४-५ दिवसांत दिल्लीत वादळी वाऱायांसह हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिल्लीत येत्या आठवड्यात उष्णतेची लाट नसेल असा अंदाजही वर्तविला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, पश्चिम राजस्थान व विदर्भ वगळता देशात आगामी ४ ते ५ दिवस ‘लू‘नसेल त्यामुळे तप्त हवेच्या झळा येणार नाहीत असेही सांगण्यात आले आहे. दिल्लीसह बिहार व झारखंडच्या अनेक गांत पावसाचा अंदाज वर्विण्यात आला आहे.

त्याचबरोबर दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील तापमानातही आज किंचित घट झाली. दिल्लीचे किमान तापमान आज सकाळी २६ डिग्री सेल्सिअस रहिले तर कमाल तापमानाचा पाराही ४५ वरून ४० डिग्री सेल्सिअसच्या आसपास स्थिरावला. दिल्लीत येत्या ४-५ दिवसांत पावसाबरोबरच वादळी वारे (आंधी) वाहतील असेही सांगण्यात आले. श्रीनगर, देहरादून, चंडीगड, जयपूर, सिमला व जम्मू या शहरांतही पावसाची शक्यता आहे. दिल्ली, हरियाणासह मध्य भारतातील काही भागांतही पावसाचा अंदाज असल्याचे आयएमडीचे वरिष्ठ वैज्ञानिक आर के जेनामनी यांनी आकाशवाणीला सांगितले. अंदमान-निकोबार भागात ५ मेच्या आसपास समुद्रात जाऊ नये असा सल्ला मच्छिमारांना देण्यात आला आहे.

Web Title: Relief From Heat Cloudy Weather Parts North India Including Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top