सिनेमा ज्या दिवशी प्रदर्शित होणार त्याच दिवशी घरबसल्या पाहता येणार

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने (RIL)त्यांच्या ग्राहकांना सर्वात मोठी भेट दिली आहे. आता घर बसल्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने कोणीही व्हिडिओ कॉल करू शकतील. 

मुंबई : देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने (RIL)त्यांच्या ग्राहकांना सर्वात मोठी भेट दिली आहे. आता घर बसल्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने कोणीही व्हिडिओ कॉल करू शकतील. 

तसेच,  जिओ फायबर एक प्रिमिअर सर्विसही लवकरच लॉन्च करणार आहे. या सर्विसमध्ये ज्या दिवशी सिनेमा प्रदर्शित होईल त्याच दिवशी ग्राहकांना तो सिनेमा पाहता येणार आहे. ही सर्विस 2020 च्या मध्यात सुरू करण्यात येणार आहे असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.

तसेच, सेट टॉप बॉक्सला गीगा फायबर नेटवर्कसह जोडण्यात येणार आहे. कंपनीच्या मते, डिजीटल युगात ही एक क्रांती असणार आहे. जिओ फायबर सर्विस 5 सप्टेंबरपासून लॉन्च करण्यात येणार आहे. जिओ फायबरचा प्लॅन 100 Mbpsपासून सुरू होईल.

बेसिक प्लॅनला हा स्पीड देण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्लॅननुसार हा स्पीड 1 Gbps पर्यंत जाईल. या सर्व प्लॅनमध्ये वॉइस कॉल मोफत असतील. जिओ फायबर प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: relience agm 2019 mukesh ambani announce jio fiber service