
धार्मिक मुद्द्यांवरील गुन्हेगारी आणि मालमत्तांच्या प्रकरणांची सोडवणूक करण्यासाठी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी सरस्वती यांनी धार्मिक न्यायालयाची घोषणा केलीय. धार्मिक बाबी या धर्माचार्यांकडे, धार्मिक न्यायालयाकडे न्या असं त्यांनी म्हटलंय. न्यायालयाला धर्माच्या लहान लहान गोष्टी कळत नाहीत असं सांगताना अविमुक्तेश्वरानंद यांनी तिरुपती प्रसाद प्रकरणाचा दाखला दिला. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली होती.