esakal | रेमडेसिव्हिरची अखेर आयात करायला सुरुवात

बोलून बातमी शोधा

remdesivir
रेमडेसिव्हिरची अखेर आयात करायला सुरुवात
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोना उपचारासाठी महत्त्वाच्या रेमडेसिव्हिर औषधाची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने अन्य देशांकडून ते आयात करायला सुरवात केली आहे. एकूण साडेचार लाख कुप्या मागविण्यात आल्या असून, त्यापैकी ७५ हजार कुप्या शुक्रवारी पोहोचणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कंपन्यांकडून चार लाख ५० हजार कुप्या मागविण्यात आल्या आहेत. पुढील एक ते दोन दिवसांत ७५ हजार ते एक लाख, तर १५ मेपर्यंत किंवा त्याआधी आणखी एक लाख कुप्या मिळतील.

सरकारने देशातील उत्पादन क्षमताही वाढविली आहे. देशांतर्गत सात परवानाधारक उत्पादकांची उत्पादन क्षमता दरमहा ३८ लाखांवरून १ कोटी ३ लाख कुप्या इतकी वाढली आहे. गेल्या सात दिवसांत कंपन्यांनी देशभरात एकूण १३.७३ लाख कुप्यांचा पुरवठा केला आहे.

हेही वाचा: 'ऑक्सिजन सिलिंडर मिळाले नाही तर ते मरतील'; वकीलाला कोर्टात रडू कोसळलं

पुरवठा सुरळीत होण्यासासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केल्या आहेत. औषधाची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने निर्यातीवरही बंदी घातली आहे.

किंमत कमी, सीमाशुल्क माफ

सर्व सामान्यांना इंजेक्शन परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्यासाठी सुधारित किरकोळ किंमत जाहीर करत सर्व प्रमुख ब्रँडची किंमत प्रति कुपी साडेतीन हजार रुपयांपेक्षा कमी करण्यात आली. जास्त उत्पादन आणि उपलब्धता सुलभ करण्यासाठी सीमाशुल्क माफ करण्यात आले.