Republic Day : PM मोदींनी दिल्या सदिच्छा; राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन!

नवी दिल्ली : आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन! संपूर्ण देश लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सकाळी राजपथावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राजपथावर देशाच्या अदम्य अशा शौऱ्याचं प्रदर्शन सुरु झालं. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा प्रजासत्ताक दिन नेहमीसारखा नाहीये. दुसरीकडे आज कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची 'किसान गणतत्र परेड' आहे. या परेडमध्ये लाखो शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
पीएम मोदी यांनी 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासीयांना सदिच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करुन सदिच्छा दिल्या. देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खुप साऱ्या सदिच्छा. जय हिंद! असं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वेळच्या परेडमधील मार्च करणाऱ्या दस्त्यांची संख्या 144 वरुन 96 वर नेली आहे. तसेच या कार्यक्रमात सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करणे अनिवार्य असणार आहे. परेड पाहणाऱ्यांची संख्या देखील कमी करुन फक्त 25 हजार लोकांच्या समोर हा कार्यक्रम पार पडेल. याआधी किमान 1.5 लाख या कार्यक्रमाला उपस्थित असायचे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरक्षा-व्यवस्थेबाबत कडम अंमलबजावणी केली जात आहे. राजधानी दिल्लीसहित मुंबई आणि इतर अन्य शहरांमध्ये ठिकठिकाणी पोलिस तैनात केले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची तपासणी केली जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day 2021 pm modi greets indians tractor rally