Republic Day : यंदा राजपथावर ब्रिटीश नाही तर 'या' भारतीय तोफा देणार सलामी

यंदा राजपथावर ब्रिटीश २५ पाउंडर च्या जागी स्वदेशी १०५ मिमी इंडियन फिल्डगन त्याची जागा घेणार. यंदा राजपथावर स्वदेशी ताकद सादर होणार.
Republic Day
Republic Dayesakal

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनी जेव्हा सर्वोच्च सेनापती ध्वजारोहण करतात तेव्हा २१ तोफांची सलामी दिली जाते. ७ तोफा राष्ट्रगीत होण्याच्या ५२ सेकंदात २१ वेळा फायरींग करतात. यंदा हा आवाज ब्रिटीश तोफांचा नाही तर स्वदेशी तोफांचा असेल. राजपथावर ब्रिटीश २५ पाउंडरच्या जागेवर स्वदेशी १०५ मिमी इंडियन फील्ड गन त्या जागी असतील. दिल्ली एरियाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल भवनीश कुमार यांनी सांगितलं की, यंदा राजपथावर भारतीय सेनेच्या स्वदेशी ताकदीला सादर करेल.

ब्रिटीश २५ पाउंडर गन तोफांविषयी

ही तोफ १९४७, १९६५ आणि १९७१ च्या युध्दात पाकिस्तान विरुध्द वापरण्यात आले आहे. तर १९६२ च्या युद्धात चीनच्या विरुध्द महत्वपूर्ण काम केलं आहे. शिवाय दुसऱ्या महायुध्दातही चांगली कामगीरी केली होती. ९० च्या दशकाच्या सुरुवातीलाच या तोफेला रिटायर्ड करून त्याजागी स्वदेशी १०५ मिमी इंडियन फील्ड गन (तोफ) आणली गेली. या तोफेचं नाव २५ पाउंडर आहे. याचा अर्थ असा की, ८८ मिमी कॅलिबरच्या तोफेतून डागला जाणारा गोळा २५ पाउंडचा असतो.

Republic Day
Republic Day 2023 : ‘याची देही याची डोळा’ पहायचाय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा?; असे बुक करा तिकीट!

भारतीय सैन्यातून या तोफेला रिटायर्ड केल्यावर सेरेमोनियल तोफ म्हणून वापरलं जात होतं. ही तोफ प्रजासत्ताक दिनी, १५ ऑगस्ट व्यतिरीक्त इतर देशांचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या दौऱ्या दरम्यान सन्मानासाठी त्याचा वापर केला जातो. २०२२ मध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाल्यावर या तोफेने शेवटच्या वेळी २१ तोफांची सलामी दिली होती.

Republic Day
Chitrarath Republic Day : तीन राज्यांच्या चित्ररथाला वैदर्भीय शिल्पकारांचे हात

राजपथावर स्वदेशी ताकद

राजपथावरुन आपल्या स्वदेशी ताकदीचा निनाद जगाला ऐकू जाणार. यंदा प्रजासत्ताक दिनी स्वदेशी तोफा २१ तोफांची सलामी देणार आहे. यात भारतीय सैन्याचे जेवढेपण शस्त्र आहेत त्यांच यावेळी प्रदर्शन भरवण्यात येइल. यात अर्जून टँक, नाग मिसाइल, बीएमपी -२, k-9 वज्र, शॉर्ट स्पॅम ब्रिज, आर्मी एयर डिफेंस आकाश मिसाइल, आर्मी एव्हिएशन कोरचे तीन रुद्र, ध्रुव यांचा समावेश असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com