
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश वापरा..!
प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत असतात. कारण हा दिवस सर्वांकरताच अभिनाचा दिवस म्हणून मानला जातो. हा सण विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. यादिवशी शाळा आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी मोठ्या आनंदात हा सण साजरा करतात. तसेच अनेक ऑफिसेसमध्ये देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी ऑफिसमध्ये पांढऱ्य़ा रंगाचे कपडे घालून ध्वजारोहण केले जाते. विशेष म्हणजे यादिवशी सर्वजण एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात.आजच्या लेखात या शुभेच्छा देणारे खास संदेश आम्ही तुमच्या करता घेऊन आलो आहोत.
विज्ञान, निर्भयता आणि नीतीचं राज्य म्हणजेचं भारतातील प्रजासत्ताकाचं राज्य... या देशातील संविधान अधिक मजबूत करुयात... देशाला अधिक उंचीवर नेऊयात... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
तीन रंग प्रतिभेचे नारंगी,पांढरा अन हिरवा रंगले न जाणेकिती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहानेप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
“भारत देश विविध रंगांचा, विविध ढगांचा आणि विविधता जपणार्या एकत्मतेचा….. प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा”
“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
'हा आपला, तो परका' ही भेदभावाची वागणूक विसरुया आणि 'आम्ही भारताचे लोक...' ही जाणीव विकसित करुयात... चला भारतातील एकात्मता अधिक वृद्धींगत करुयात... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
'भेदाभ्रम भ्रम अमंगळ' असं म्हणणाऱ्या संतविचारांचा जागर करुयात... भेद विसरुन भारतीय प्रजासत्ताक चिरायू करुयात... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
हेही वाचा: Republic Day 2023 : 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणात नेमका काय फरक आहे?
'भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना...' या ध्येयासाठी लढूयात... भारतीय संविधानातील मूल्ये प्रत्यक्ष जगूयात... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनि राहो...' भारताला बलसागर करण्यासाठी संविधानाचे पालन करुयात.... चला... भारताला एक मजबूत राष्ट्र बनवूयात... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
'कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पडता है...' त्यामुळे, चला उठा... आपल्या देशासाठी संविधानात दिलेले कर्तव्ये पार पाडूयात... होय... फक्त एवढंच करुयात.... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
हेही वाचा: Republic Day 2023 : घटनादुरुस्तीच्या 'या' 3 पद्धती तुम्हाला महितीयेत का?
लहरतो आहे तिरंगा अभिमानानेउंच आज या आकाशीउजळत ठेऊ सारे रंग त्याचेघेऊ प्रण हा मुखानेप्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!