आता दरवर्षी 23 जानेवारीपासून सुरू होणार प्रजासत्ताक दिन उत्सव, केंद्राचा मोठा निर्णय | Republic day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

modi

आता दरवर्षी 23 जानेवारीपासून सुरू होणार प्रजासत्ताक दिन उत्सव

केंद्र सरकारने (central government) प्रजासत्ताक दिनानिमित्त (republic day) मोठा निर्णय घेतला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार म्हटलंय की, देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू होईल.

मोदी सरकारचा मोठा निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारचा हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे. भाजप सरकारने यापूर्वीच अनेक तारखांना राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस म्हणून घोषित केले आहे. यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन आणि 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी तारीख बदलली

स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारीला येते हे लक्षात घेऊन सरकारने आता प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: Video : रणगाडे, हेलिकॉप्टर, ड्रोन, मशिन गन्स; अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिकं

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top