Republic Day History: आपले संविधान 26 जानेवारीलाच का लागू झाले? जाणून घ्या इतिहास

26 जानेवारीलाच आपल्या राज्यघटनेची अमंलबजावणी का करण्यात आली? जाणून घ्या संपूर्ण इतिहास
History of Indian Republic Day
History of Indian Republic Day

Republic Day 2022 : आपण सर्व भारतीय दरवर्षी उत्साहाने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि यंदा आपला देश ७३वा प्रजासत्ताक दिन (73rd Republic Day) साजरा करणार आहे. २६ जानेवारीच्या दिवशी भारत (India) एक सार्वभौम प्रजासत्ताक(Sovereign Republic)राष्ट्र बनले होते. 1947 मध्ये भारताला ब्रिटिशांपासून (British) स्वातंत्र्य मिळाले, परंतू 26 जानेवारी 1950 पर्यंत राज्यघटना लागू झाली नव्हती. (Republic Day Why did our constitution come into force on January)

संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक देश बनला. आपण सारे भारतीय धार्मिक भेदभावाच्या पलीकडे जाऊन एक राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहाने हा दिवस साजरा करतो. संपूर्ण देशामध्ये या दिवशी शाळा , महाविद्यालय, सराकारी कार्यालयांपासून सर्वसाधारण जागी तिरंगा फडकविला जातो. दरवर्षी या विशेष प्रसंगी इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर भव्य पथसंचलन पार पडते. या पथसंचलनामध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल अशा विविध रेजिमेंट्स भाग घेत आहेत. (History of Indian Republic Day)

History of Indian Republic Day
Amazon Republic Day Sale : 'या' टॉप स्मार्टफोनवर मिळतायत बेस्ट डील्स

२६ जानेवारीलाच संविधान का लागू करण्यात आले (Why the constitution was enacted only on January 26)

खरे तर याच दिवशी म्हणजे २६ जानेवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्याची घोषणा केली. याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास १९२९मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेमध्ये नॅशनल कॉंग्रेसमार्फत एक सभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सर्वानुमते असे घोषित करण्यात आले की, ''ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा (Dominion Status)द्यावा. त्यानंतर, भारताला ब्रिटीश साम्राज्याखाली स्वायत्त राज्याचा दर्जा मिळताच, देश स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र घोषित करेल.''

भारताच्या स्वातंत्र्यानंतर, संविधान सभेची घोषणा केली गेली आणि ९ डिसेंबर १९४८मध्ये या सभेने आपले काम सूरू केले. संविधान सभेच्या मार्फत २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांमध्ये संविधान तयार करण्यात होते आणि भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सोपविले होते. त्यामुळे दरवर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिवसाच्या रुपात साजरा करण्यात आला होता.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, भारतीय संविधानाचा मसुदा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी तयार केला होता, ज्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर, समितीच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर स्वाक्षरी केली, त्यानंतर दोन दिवसांनी 26 जानेवारी रोजी तो देशात लागू झाला. २६ जानेवारीचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी भारताला एक लोकशाही देश म्हणून ओळख देण्यात आली होती.

REPUBLIC DAY: आपला राष्ट्रध्वज फडकविण्याचे हे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

२६ जानेवारी साजरा करण्याचे 'हे' आहे कारण (This is the reason for celebrating 26th January)

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वांतत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५०ला संविधान लागू झाल्यानंतर भारत एक लोकशाही देश बनला. राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर, आधीपासून अस्तित्वात असलेला ब्रिटीश कायदा "गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट' (1935) ( Government of India Act (1935)) भारतीय संविधानामार्फत भारताच्या शासनाचा दस्तऐवज म्हणून बदलण्यात आला. त्यामुळे दरवर्षी भारतीय २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतात. 'द वायर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, ''भारत २६ जानेवारी १९५०ला सकाली १० वाजून १८ मिनिटांनी एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यानंतर ठिक ६ मिनिटांनतर १० वाजून २४ मिनिटांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या दिवशी, प्रथमच, डॉ. राजेंद्र प्रसाद, राष्ट्रपती म्हणून, एका रथामधून राष्ट्रपती भवनातून बाहेर पडले, जिथे त्यांनी पहिल्यांदा लष्कराला सलामी दिली आणि पहिल्यांदाच त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.''(History of Indian Republic Day)

या दिवशी आपण भारतीय तिरंगा फडकावतो, राष्ट्रगीत म्हणतो तसेच रस्त्यावर चौका-चौकांमध्ये, शाळा, महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी शो आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय, भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस आणि निमलष्करी दलांसह संरक्षण दल आपले कौशल्य, पराक्रम आणि सामर्थ्य प्रदर्शित करतात आणि राजपथावरील पथसंचलनांमध्ये भारताचे संरक्षण कौशल्य प्रदर्शित करतात, ज्याचे थेट प्रसारन टिव्हीवर केले जाते. स्टंट्सशिवाय एअरबाईक, मोटारसायकल, टँक आणि इतर शस्त्रांवरील स्टंट देखील भारतीयांसमोर प्रदर्शित केले जातात. यासोबतच सुंदर सजवलेले चित्ररथ असतात जे भारतातील भारतातील विविध राज्यांचे सौंदर्य आणि सांस्कृतिक परंपरा दर्शवितात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com