.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
आगरताळा : त्रिपुराने पुरामुळे हाहाकार उडाला असून रविवारपासून (ता. १८) पुराशी संबंधित विविध घटनांत किमान दहा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ३२,७५० जणांनी ३३० मदत छावण्यात आश्रय घेतला आहे. मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या विनंतीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बचाव मोहिमेसाठी ‘एनडीआरएफ’च्या चार अतिरिक्त तुकड्या त्रिपुराला रवाना केल्या.