कोरोनाबाधित मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका! संशोधनातून समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid

कोरोनाबाधित मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका! संशोधनातून समोर

कोरोनाव्हायरस संदर्भातील एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे. की कोरोनाची ज्या मुलांना लागन झाली होती त्यामुलांना मधुमेहाचा धोका जास्त आहे. या संशोधनाबाबत दिलेली माहिती 'जामा नेटवर्क ओपन'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या मुलांवर संशोधन करण्यात आले, ते 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.

कोविड-19 ची लागण न झालेल्या लोकांना सहा महिन्यानंतर मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या संख्येत 72 टक्के वाढ झाली आहे. संशोधनात, कोरोनाची लागण झालेल्या सहा महिन्यांत एकूण 123 रुग्ण मधुमेहाने ग्रस्त असल्याचे आढळून आले. ज्यांना श्वसन प्रणालीच्या संसर्गाची लागण झाली होती.

याशिवाय, मार्च 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यान SARC-Cov-2 ची लागण झालेल्या, अमेरिका आणि अन्य 13 देशांमधील 18 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या 10 लाखांहून अधिक लोकांवर संशोधन करण्यात आले. या रूग्णांमध्ये कोरोणा कालावधीत श्वसन संसर्गाची लागण झालेल्यांचाही समावेश आहे. ज्यांचा कोविड-19 शी संबंध नव्हता. यूएस मधील केस वेस्टर्न रिझर्व्ह स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रोफेसर पामेला डेव्हिस म्हणतात की "मधुमेह हा एक स्वयंप्रतिकार रोग मानला जातो.

टॅग्स :covid 19Covid