ATM मधून पैसे काढताय? जास्त व्यवहारांसाठी द्यावं लागणार इतके शुल्क| ATM Transaction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atm money

ATM मधून पैसे काढताय? जास्त व्यवहारांसाठी द्यावं लागणार इतके शुल्क

आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात काही बदल घडणार आहेत. काहींमध्ये बदल होणार आहेत. असे असताना नवीन वर्षात एटीएममधून पैसे काढणे महाग (Withdrawing money expensive) झाले आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) जून २०२१ मध्ये अधिसूचना जाहीर केली होती. त्यानुसार १ जानेवारी २०२२ पासून ग्राहकांना मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार (There will be an additional charge) आहे.

ग्राहक एटीएममधून (ATM Transaction) दर महिन्याला पाचवेळा मोफत पैसे काढू शकतो. तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहे त्या बॅंकेच्या एटीएममधून महिन्याला पाचवेळा व्यवहार करण्यासाठी शुल्क भरावे लागणार नाही. यावरील व्यवहारांसाठी तुम्हाला २१ रुपये किंवा त्याहून अधिक पैसे द्यावे लागतील. तसेच ग्राहक इतर बँकेच्या एटीएममधून (आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसह) विनामूल्य व्यवहारांसाठी देखील पात्र आहे. तीन व्यवहार मेट्रो शहरांमध्ये आहेत आणि पाच व्यवहार नॉन-मेट्रो शहरांमध्ये आहेत.

हेही वाचा: ३१ डिसेंबरपासून आठवीपर्यंतच्या शाळा बंद; हिवाळी सुट्ट्या जाहीर

एटीएम स्थापनेचा वाढता खर्च आणि एटीएम दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाचे कारण देत आरबीआयने १ जानेवारी २०२२ पासून बदल होणार असल्याचे सूचित केले (Withdrawing money expensive) होते. एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्काची रचना ऑगस्ट २०१२ मध्ये शेवट बदलण्यात आली होती. त्याचवेळी ग्राहकांनी देय शुल्क ऑगस्ट २०१४ मध्ये शेवटचे सुधारित केले होते.

ग्राहकांवर भार

पूर्वी मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी ग्राहकांना २० रुपये मोजावे लागत होते. परंतु, आता २१ रुपये किंवा त्याहून अधिक भरावे लागतील. त्यानुसार १ किंवा २ रुपयांचा भार ग्राहकांवर पडू शकतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top