'... तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी'

दिल्ली, बंगळुरातील राजकीय हालचालीना वेग
'... तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी'

बंगळूर : बी.एस. येडियुराप्पा (BS yeddyurappa) यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (resign) देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जोपर्यंत भाजप हायकमांडचा विश्वास आहे, तोपर्यंत आपण राज्य सरकारचे नेतृत्व करत राहू, असे सांगून त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचे मानण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात काही मंत्री आणि आमदारांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असल्याच्या प्रसार माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘‘आपण या गोष्टींवर प्रतिक्रिया देणार नाही. जोपर्यंत हायकमांडने माझ्यावर विश्वास ठेवला आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर कायम राहीन. ज्या दिवशी ते आपल्याला पद सोडायला सांगतील, त्याच क्षणी आपण राजीनामा देऊ. पण त्यानंतरहीराज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करत राहू. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपण पक्ष आणि सरकारची कोणतीही कोंडी करीत नाही. पक्षनेतृत्वाने आपल्याला संधी दिली आहे, ज्याचा आपण चांगला उपयोग करीत आहे. बाकी सर्वकांही हायकमांडवर सोडले आहे.’’

नाराज आमदारांच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांना काढून टाकण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याच्या वृत्तावर त्यांचे हे विधान आहे. राज्य सरकारच्या (karnatka state government) नेतृत्वाविरोधात तक्रारी घेऊन काही नेते अलीकडेच दिल्लीला (delhi) गेले होते. येडियुराप्पा यांनी राज्यात 'पर्यायी नेतृत्व नसल्याच्या' चर्चा त्यांनी फेटाळून लावली,’’ असे कोणतेही पर्यायी नेते नसल्याचा दावा केलेले नाही,” असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षात पर्यायी नेते नेहमी असतात,’’ असे ते म्हणाले.

'... तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी'
भारतातून पळून आलो नाही; चोक्सीनं सांगितलं देश सोडण्याचं कारण

आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. आपण कोणावर टीका करणार नाही. ‘उद्या राजीनामा द्या म्हणून श्रेष्ठींनी आपल्याला आदेश दिल्यास आपण आनंदाने राजीनामा देऊ. पक्षाने आपल्याला सर्व काही दिले. याची जाणीव आहे. आपण संघाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहोत. नेतृत्वबदलाचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून चर्चेत आला आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांनी याबद्दल कधीच गंभीर विधान केले नाही. मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य माध्यमांसमोर केले असले तरी, पक्षातील विरोधकांना व हायकमांडला हा एकप्रकारे संदेश असल्याचे मानले जात आहे.

भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पंचायत राज व ग्रामीण विकास मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी आपल्या खात्यात मुख्यमंत्री सतत हस्तक्षेप करीत असल्याची हायकमांड व राज्यपालांकडे तक्रार केली होती. पर्यटन खात्याचे मंत्री सी. पी. योगेश्वर आणि आमदारांनी मागील आठवड्यातच दिल्लीला जाऊन नेतृत्व बदलाची हायकमांडकडे मागणी केली होती. त्याबरोबर येडियुराप्पा समर्थक आमदारांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले होते. या सर्व घडामोडीवर येडियुरप्पांच्या आजच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे हे विधान म्हणजे एक राजकीय डावपेचाचा भाग असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने त्यांच्या विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. येडियुराप्पा यांना जोपर्यंत हायकमांडचा पाठिंबा आहे, तोपर्यंत कोण काहीही करु शकत नसल्याचा स्पष्ट संदेश असल्याचे मानण्यात येत आहे.

'... तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी'
जम्मू-काश्मीर : पुलवामात पोलिसांवर दहशतवादी हल्ला; सात जखमी

निष्ठावतांची सह्यांची मोहीम

येडियुराप्पा यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविताच त्यांच्या समर्थक आमदारांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. येडियुराप्पाच कार्यकाळ संपेपर्यंत मुख्यमंत्रीपदावर राहावेत, यासाठी त्यांच्या समर्थनार्थ सह्या घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. येडियुराप्पा यांना भाजपच्या ८० टक्के आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते.

"राज्य भाजपमध्ये कोणतेच मतभेद नाहीत. येडियुराप्पा हेच आमचे नेते. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही."

- नलीनकुमार कटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

"येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. हायकमांडसमोर असा कोणताच प्रस्ताव नाही."

- प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री

'... तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी'
"शिवरायांचं नौदल धोरण देशाला आजही दिशादर्शक"

"येडियुराप्पांविरुध्द बोलणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे. सत्तेवर येताच येडियुराप्पा यांनी जनतेच्या कल्याणासाठी कार्य केले आहे."

- बसवराज बोम्मई, गृहमंत्री

"कोरोनाकाळात इतर राज्यांचे मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले नाहीत. अशा परिस्थितीतही येडियुराप्पा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. नेतृत्व बदल नको."

- आर. अशोक, महसूल मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com