रिफाइंड खाद्यतेल आयातीवर निर्बंध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

सरकारी कंपन्यांमार्फतच आयातीचा विचार
रिफाइंड खाद्यतेल आयातीवर निर्बंध घातल्यानंतर केंद्र सरकार खाद्यतेल आयात केवळ सरकारी कंपन्यांच्या माध्यमातूनच करण्याचा विचार करत आहे. रिफाइंड खाद्यतेल, विशेषतः पामतेल आयात खासगी कंपन्यांमार्फत करण्यास सरकार इच्छुक नाही. त्यामुळे केवळ सराकारी कंपन्यांच्या माध्यमातूनच आयातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सरकार एमएमटीसी लि. आणि नाफेडला रिफाईंड खाद्यतेल आयात करण्यासाठी सांगू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत, अशी माहिती विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आशियान देशांसोबत केलेल्या व्यापार करारानुसार १ जानेवारीपासून या देशांतून आयात होणाऱ्या रिफाईंड आणि कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात झाली आहे. त्यामुळे आयात वाढून देशांतर्गत रिफायनरी उद्योगाला याचा फटका बसण्याची शक्यता उद्योगाने व्यक्ते केली होती.

त्यामुळे रिफायनरी उद्योगाच्या मागणीवरून केंद्र सरकार रिफाईंड खाद्यतेलाच्या आयातीवर मर्यादा घालण्याच्या विचारत होते. त्यानुसार बुधवारी (ता. ८) केंद्र सरकारने रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनची आयातीवर मर्यादा घातल्या आहेत.

मुलांना शाळेत पाठवा अन् 15 हजार मिळवा; सरकारची योजना

आशियान देशांशी झालेल्या व्यापार करारानुसार भारताने या देशांमधून आयात होणाऱ्या रिफाईंड पाम तेलावरील आयातशुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के आणि कच्च्या पाम तेलावरील आयातशुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्याचे मान्य केले होते. या करारामुळे रिफाईंड आणि कच्च्या पामतेल आयातीशुल्कातील फरक हा १० टक्क्यांवरून २.५ टक्क्यांनी कमी होऊन ७.५ टक्क्यांवर आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू होणार होती. त्यामुळे देशातील रिफानरी उद्योगाने रिफाईंड खाद्यतेल आयातीवर मर्यादा घालण्याची मागणी केली होती. 

आयातीत २८ टक्क्यांनी वाढ
तेल आयातीचा विचार करता आधीच रिफाईंड खाद्यतेलाची आयात ही कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीपेक्षा जास्त पटीने वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपलेल्या तेल वर्षात रिफाईंड पामोलिनची आयात मागील वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढून २७ लाख टन झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restrictions on import of refined edible oil