महागाईचा आलेख वाढताच; किरकोळ महागाई दरात एका टक्क्याने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inflation

महागाईचा आलेख वाढताच; किरकोळ महागाई दरात एका टक्क्याने वाढ

नवी दिल्ली : महागाईचा आलेख सारखा वाढताना आपल्याला दिसत असून मार्चच्या तुलनेत किरकोळ महागाईमध्ये १ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये किरकोळ महागाईमध्ये वाढ झालेली असून मार्चमध्ये ६.९५ टक्के असलेली महागाई वाढून ती एप्रिलमध्ये ७.७९ टक्के इतकी झाली आहे.

(Inflation News)

सध्या देशभरात वाढत असलेल्या पेट्रोल, खाद्यपदार्थ आणि गॅसचे दरही वारंवार वाढत आहेत. याच वाढत्या भावाचा परिणाम किरकोळ महागाई वाढण्यासाठी झाला आहे असं बोललं जातंय.

हेही वाचा: बुद्ध, जैन, बसवेश्वर यांनी आधी विद्रोह केला मग...; आव्हाडांची पवारांना पाठराखण

विशेष म्हणजे केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला रिटेल महागाई दर दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई, जी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) जवळपास निम्मी आहे, ती आता एप्रिलमध्ये उच्चांकावर पोहोचली आहे. भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे त्यात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान २०२१ च्या एप्रिलमध्ये महागाईचा दर हा फक्त ४.२१ टक्के इतका होता. तुलना केली तर २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये किरकोळ माहगाई दरामध्ये ३.५६ टक्क्याने वाढ झालेली आहे. सध्या देशात महागाईचा आलेख वाढत असून खाद्यपदार्थ आणि पेट्रोलच्या वाढत्या भावाचा परिणाम होऊन किरकोळ महागाईमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Web Title: Retail Inflation Jumps 1 Percent Than March Month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :inflationFuel
go to top