Retail Inflation : ऐन दिवाळीत सामान्यांचं गणित बिघडणार; किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

inflation

Retail Inflation : ऐन दिवाळीत सामान्यांचं गणित बिघडणार; किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर

Retail Inflation Data : सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईत वाढ झाली असून, सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.41 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई 7 टक्के तर, जुलैमध्ये हा दर 6.71 टक्क्यांवर होता. सप्टेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात खाद्यपदार्थांच्या महागाईत वाढ झाली आहे.

एक वर्षापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये किरकोळ महागाई दर 4.35 टक्के होता. यावर्षी सप्टेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमतीत 8.60 टक्क्यांची वाढ पाहण्यास मिळाली. जी ऑगस्टमध्ये 7.62 टक्क्यांवर होती. जुलैमध्ये ही आकडेवारी 6.75 टक्के आणि जूनमध्ये 7.75 टक्क्यांवर होती. भाज्यांच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ऑगस्ट 2022 मध्ये 13.23 टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भाज्यांचे दर 16.78 टक्के झाला आहे. 

टॅग्स :moneyinflationBudget