Amit Shah: अमित शहांच्या वक्तव्यावर माजी न्यायाधीशांची टीका; ‘दुर्दैवी’ ठरवून सभ्य राजकीय प्रचाराची गरज अधोरेखित
India Politics: गृहमंत्री अमित शहा यांच्या बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावरील वक्तव्यावर सर्वोच्च व उच्च न्यायालयातील १८ निवृत्त न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. या टिप्पणीला त्यांनी ‘दुर्दैवी’ म्हणत उपराष्ट्रपतिपद निवडणुकीतील प्रचार सभ्यतेने व्हावा, असे आवाहन केले.
नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर निवृत्त न्यायाधीशांनी टीका केली आहे.