आत्महत्येसाठी ममतांनीच केेले प्रवृत्त; आयपीएस अधिकाऱ्याची सुसाईड नोट

वृत्तसंस्था
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

कोलकता : निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

यावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी आता गौरव दत्त यांची पत्नी भाजप नेते मुकुल रॉय यांच्यासह सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत. 1986च्या बॅचचे असलेले गौरव दत्ता यांनी 19 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती.

गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत स्पष्ट म्हटले आहे की, ममतां बॅनर्जी यांनी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. ममतांनी त्यांना 'कंपलसरी वेटींग'वर ठेवलं आणि 31 डिसेंबर 2018 रोजी निवृत्त झाल्यानंतर मिळणारे पैसे देखील दिले नाहीत असे लिहले आहे.

दरम्यान, गौरव दत्त यांनी राहत्या घरी हाताची नस कापून आत्महत्या केली. ज्यावेळी त्यांची पत्नी घरी पोहोचली तेव्हा दत्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण, तोवर फार उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. याप्रकरणी आता ममतांची सीबीआय मार्फत चौकशी करत अटक करा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Senior Kolkata Cop Blames Mamata Banerjee In Suicide Note