रेवा (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील चाकघाट रुग्णालयात एका महिलेने दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या बाळाला जन्म (Rewa Baby Birth) दिला. या बाळाचा चेहरा आणि शरीर एलियनसारखे दिसत असल्याने उपस्थित डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी थक्क झाले. बाळाची प्रकृती गंभीर असून त्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.