
नवीन वर्ष सुरू होताच देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे एकूण 931 कोटींची संपत्ती आहे. अहवालानुसार, भारतातील मुख्यमंत्र्यांचे सरासरी स्व-उत्पन्न 13,64,310 रुपये आहे. जे भारताच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा सुमारे 7.3 पट जास्त आहे.