Rinku Sharma Murder: बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या पाठीत आरपार खुपसला चाकू; परिसरात तणाव

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 12 February 2021

नवी दिल्लीतील मंगोलपुरी भागात बुधवारी रात्री जवळपास ६ हल्लेखोरांनी एका युवकाची हत्या केली आहे.

नवी दिल्ली- नवी दिल्लीतील मंगोलपुरी भागात बुधवारी रात्री जवळपास ६ हल्लेखोरांनी एका युवकाची हत्या केली आहे. हत्येमागे कार्यक्रमादरम्यान झालेला वाद कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. मृत तरुणाची ओळख २५ वर्षीय रिंकू शर्मा आहे. रिंकूच्या हत्येमुळे दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. रिंकू बजरंग दल आणि भाजप युवा मोर्चाचा सदस्य होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकूच्या भावाच्या तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षीय मनु शर्माने म्हटलंय की, तो आई-वडील आणि भावासोबत मंगोलपूरी स्थित ब्लॉकमध्ये राहतात. मनुने आरोप केलाय की, घरापासून जवळच दानिश उर्फ लाली, इस्लाम, मेहताब उर्फ नाटू आणि जाहिद उर्फ छिंगू राहतात. रिंकू शर्मा आणि या चौघांमध्ये दसऱ्याच्या दिवशी राम मंदिर पार्कमधील कार्यक्रमावरुन वाद झाला होता. मनुचे म्हणणे आहे की, तेव्हापासून त्याच्या भावाला धमक्या मिळत होत्या. 

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंची राज्य सरकारकडे...

तयारीनिशी आले होते हल्लेखोर

एफआयरनुसार, दानिश आपले मित्र इस्लाम, मेहताब, जाहिद यांच्यासोबत बुधवारी रात्री १०.३० वाजता रिंकुच्या घरासमोर आला. सगळ्यांच्या हातात शस्त्र होते. त्यांनी घराबाहेर येत शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर रिंकू आणि इस्लाममध्ये वाद सुरु झाला. मेहताबने रिंकूवर तलवारीने हल्ला केला. चाकू रिंकूच्या पाठीत पूर्णपणे खुपसण्यात आला. जखमी झालेल्या रिंकूला मनुने संजय गांधी हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारादरम्यान रिंकूचा मृत्यू झाला. पोलिसांनी चाकू जप्त केला आहे. 

कुटुंबीयांनी सांगितलं की, बुधवारी भागातील एका मुलाने बर्थडे पार्टी दिली दोती. तेथील तरुणाचा आरोपींसोबत वाद झाला. तरुणाने रिंकूला याबाबत सांगितले. प्रकरण शांत झालं पण आरोपी रिंकूच्या घरी आले. रिंकूच्या हत्येमुळे सोशल मीडियावर युजर्स अॅक्टिव झाले आहेत. अनेकांनी संताप व्यक्त केला असून आरोपींना मृत्यूची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 

सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड

रिंकू शर्मा हत्या प्रकरण तापण्याची शक्यता आहे. ट्विटरवर #JusticeForRinkuSharma हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेकांनी या घटनेला धार्मिक रंग दिला आहे. रिंकूला न्याय देण्याची मागणी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत, प्रनिता सुभाष, आंध्र प्रदेश भाजप महासचिव एस. विष्णुवर्धन रेड्डी, यूट्यूबर एल्विश यादव, संबित पात्रा यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rinku Sharma Delhi bjp youth wing worker stabbed after birthday party

Tags
टॉपिकस
Topic Tags: