Rinpoche Reincarnation : चार वर्षाचा बालक बनला बौद्ध धर्माच्या निंग्मा पंथाचा प्रमुख! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rinpoche Reincarnation

Rinpoche Reincarnation : चार वर्षाचा बालक बनला बौद्ध धर्माच्या निंग्मा पंथाचा प्रमुख!

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील चार वर्षांच्या बालकाची निवड तिबेटीयन बौद्ध धर्माच्या निंग्मा पंथाचे प्रमुख म्हणून केली गेली आहे. नवांग ताशी रापतेन असे या मुलाचे नाव आहे. तो धर्मगुरू ताकलुंग सेतुल रिंपोचे यांचा पुनर्जन्म असल्याचे मानले जाते.

89 वर्षीय ताकलुंग सेतुल रिंपोचे यांचे बिहारमधील गया येथे 2015 मध्ये निधन झाले. 10 महिने त्यांचा मृतदेह ‘दोरजी’ डाक मठात ठेवण्यात आला होता. त्यानंतर बौद्ध नियमानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ताकलुंग रिंपोचे यांचा मृत्यू झाल्यानंतर निंग्मा पंथाच्या पुढच्या प्रमुखाचा शोध सुरू होता. रापतेनचा जन्म स्पिती खोऱ्यातील रँगरिक या दुर्गम गावात झाला.

रापतेनचा जन्म 16 एप्रिल 2018 रोजी झाला होता. भूतानमधील लोद्रक खारचू येथील बौद्ध मठात नामखाई निंगपो रिनपोचे हे भिक्षू आहेत. त्यांनीच रापतेनचा धार्मिक जीवनात प्रवेश केला. आणि त्याला ज्ञान द्यायला सुरूवात केली. निंग्मा पंथाच्या नवीन प्रमुखाचे मुंडण करण्यात आले आणि मागील सोमवारपासून त्याचे धार्मिक शिक्षण सुरू झाले.

रापतेनच्या कुटुंबातील सदस्यांना हे माहित नव्हते की तिबेटी धर्मगुरूंनी त्यांच्या घरात पुनर्जन्म घेतला आहे. रापतेनच्या आजोबांनी सांगितले की, जेव्हा बौद्ध गुरू आमच्या घरी चौकशासाठी आले तेव्हा आम्हाला ही गोष्ट समजली. चार वर्षांच्या भिक्षूची आई केलसांग डोल्मा म्हणाली, 'मला कधीच वाटले नव्हते की आमचा मुलगा गुरू रिंपोचे यांचा पुनर्जन्म आहे. रॅप्टनच्या आईने असेही सांगितले की मुलापासून वेगळे झाल्यामुळे तिला थोडे दुःख झाले आहे. परंतु उच्च धर्मगुरूंना जन्म देऊन मी धन्य झाले, असेही ती म्हणाली.

बौद्ध धर्मात असे मानले जाते की, उच्च दर्जाचे भिक्षू म्हणजेच तुलकू यांचा पुनर्जन्म होतो. तुलकू भिक्षू हे एक परिपूर्ण संन्यासी असतात. जे जगाच्या हितासाठी आपला पुनर्जन्म पुन्हा निवडतात. तिबेटी बौद्ध धर्मावर विश्वास ठेवणारे लोक तुलकूस शोधतात. त्यांची ओळख पटवली जाते. त्यांना सिंहासनावर बसवतात आणि त्यांना धर्माचे शिक्षणही दिले जाते.

टॅग्स :Dalai LamaTibet