न्यूझीलंडच्या संसदेत घुमला भारतीय भाषेचा आवाज; व्हिडिओ होतोय व्हायरल

priyanka.
priyanka.

नवी दिल्ली- प्रियंका राधाकृष्णन (Priyanca Radhakrishnan) या न्यूझीलंडमधील (New Zealand) पहिल्या भारतीय वंशाच्या मंत्री बनल्यानंतर संसदेतील त्यांच्या एका जून्या भाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रियंका मल्याळम भाषेतून संसदेला संबोधित करत आहे. केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

व्हिडिओमध्ये, राधाकृष्णन मल्याळममध्ये काही ओळी बोलतात. त्यानंतर त्या म्हणतात, ''श्रीमान अध्यक्ष महोदय, मला वाटतं की, मी पहिल्यांदा माझ्या मातृभाषेत बोलत आहे.'' व्हिडिओ नोव्हेंबर 2017 चा आहे. पुरी यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटलंय की, भारतासाठी गर्वाची गोष्ट आहे. न्यूझीलंडच्या भारतीय वंशाच्या मंत्री प्रियंका राधाकृष्णन यांनी मल्याळममधून देशाच्या संसदेला संबोधित केले.  

राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडमध्ये महिलांच्या हक्कासाठी मोठे काम केलं आहे. त्या 2017 मध्ये लेबर पार्टीकडून संसदेवर निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये त्यांची वंशीय समुदाय मंत्रालयाच्या संसदीय खासगी सचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या या मंत्रालयातील कामाच्या अनुभवाचा त्यांना विविधता, समावेशकता आणि वांशिक समुदाय मंत्री म्हणून फायदा होणार आहे. यासोबतच राधाकृष्णन समुदाय आणि स्वयंसेवी क्षेत्र, सामाजिक विकास आणि रोजगार सहयोगी मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. 

US Election : अमेरिकेचा हाय व्होल्टेज ड्रामा कधी संपणार?

न्यूझीलंडच्या लोकांनी पुन्हा एकदा विश्‍वासाने सत्ता हातात दिलेल्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी आपल्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांची निवड केली. न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. अर्डर्न यांनी पाच नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. 

कोण आहेत राधाकृष्णन?

राधाकृष्णन (वय ४१) यांचा जन्म तमिळनाडूमधील एका मल्याळम कुटुंबात झाला आहे. सिंगापूर येथे शिक्षण घेतल्यानंतर त्या न्यूझीलंडला स्थायिक झाल्या. त्यांनी महिलांच्या प्रश्‍नांवर काम केले आहे. त्या २०१७ मध्ये सर्वप्रथम न्यूझीलंडच्या संसदेत निवडून गेल्या होत्या. राधाकृष्णन या न्यूझीलंडच्या पहिल्या भारतीय मंत्री ठरल्या आहेत. त्या ऑकलंडमध्ये आपल्या पतीसोहत राहतात.' दरम्यान, सर्वसाधारण निवडणुकीत जेसिंडा अर्डर्न यांच्या लेबर पार्टीचा दणदणीत विजय झाला होता. त्यांच्या पक्षाला ऐतिहासिक बहुमत मिळाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com