
साखरपुडा होऊन आठ दिवस व्हायच्या आतच एका २७ वर्षीय तरुणाचा बसलेल्या जागीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ऋषभ गांधी असं तरुणाचं नाव आहे. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. दुकानात तरुण बसला असताना थोडं अस्वस्थ वाटायला लागलं. त्यावेळी तरुण पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली हातात घेतो पण तसाच कोसळतो. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.