Rishi Sunak : जनतेचा कौल मान्य

निरोपाचे भाषण करताना हुजूर पक्षाचे नेते आणि मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याआधीच्या कामांना उजाळा दिला. संसदीय निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारताना त्यांनी नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे.
Rishi Sunak
Rishi Sunaksakal
Updated on

निरोपाचे भाषण करताना हुजूर पक्षाचे नेते आणि मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याआधीच्या कामांना उजाळा दिला. संसदीय निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारताना त्यांनी नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. देशाचे प्रथम नेते या नात्याने आपल्याला डाउनिंग स्ट्रीटवर दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी जाहीरपणे आभार मानले. ब्रिटनचे मावळते पंतप्रधान ऋषी सुनक हे आजच्या भाषणादरम्यान भावूक झाले होते.

‘‘आपल्या पक्षाला काही आश्वासने पूर्ण न करता आल्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी देखील मागितली. आपण प्रत्येकाला त्याचे काम नेमून दिले होते पण आपल्या काही सहकाऱ्यांना पराभावाचे तोंड पाहावे लागले. लोकांनी बदलाच्या बाजून कौल दिला आहे,’’ असे सुनक म्हणाले.

ब्रिटन स्ट्राँगरचा नारा

‘ब्रेक्झिट’साठी २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतामुळे सगळा युरोप ढवळून निघाला होता, त्यावेळी स्टार्मर यांनी ‘ब्रिटन स्ट्राँगर’चा नारा दिला पण त्यानंतर त्यांनी पुन्हा जेर्मी कॉर्बीन यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या सार्वमताचे समर्थन केले. कॉर्बिन यांच्या राजीनाम्यानंतर स्टार्मर यांनी लेबर पक्षातील नेतृत्वाची लढाई जिंकली. स्वतःची स्वतंत्र समाजवादी मांडणी करणारे आणि शाकाहाराचे पुरस्कर्ते असलेल्या स्टार्मर यांनी लेबर पक्षाला उजवे वळण दिल्याचे बोलले जाते.

तुमचा राग समजलाय

‘‘ तुमच्या मनातील राग आणि निराशा मी ऐकली आहे त्यामुळे मी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो. मी पक्षाचे नेतेपद सोडत आहे. या पदावरून मी तातडीने पायउतार होणार नसलो तरीसुद्धा पुढील नेतृत्वाकडे औपचारिक सूत्रे देऊन बाजूला होण्याचा माझा विचार आहे,’’ असे सुनक यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.