
लालू यादव यांना आज दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच लालूंनी उचलला भोंग्यांचा मुद्दा; म्हणाले...
पाटणा (बिहार) : आरजेडी सुप्रीमो लालू यादव (Lalu Yadav) यांना आज (बुधवार) सायंकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून (Delhi AIIMS Hospital) डिस्चार्ज देण्यात आलाय. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर लालूंना एम्समधून डिस्चार्ज दिला गेलाय. त्यानंतर लालू यादव त्यांची मोठी मुलगी आणि राज्यसभा खासदार मीसा भारती (Misa Bharti) यांच्या पंडारा पार्कमधील निवासस्थानी पोहोचले.
इथं माध्यमांशी बोलताना लालू यादव यांनी सांगितलं की, डॉक्टरांनी मला धीर धरण्याचा सल्ला दिलाय. डॉक्टरांच्या सल्ल्यानं आठवडाभरानंतर मी पाटणाला जाऊ शकतो, असं ते म्हणाले. यावेळी लालू यादव यांनी सध्याच्या राजकीय मुद्द्यांवरही खुलेपणानं चर्चा केली.
हेही वाचा: कोलकाता न्यायालयाबाहेर चिदंबरम यांना दाखवले काळे झेंडे
लाऊडस्पीकरच्या (Mosque loudspeaker) वादावर आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, हे सर्व अत्यंत चुकीचं आहे. आपल्या देशाचे तुकडे-तुकडे करण्यासारखा हा प्रकार आहे. तुम्ही मशिदीजवळ का जात आहात? हनुमान चालिसा वाचायची असेल तर मंदिरात जावा, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. या हिंदू-मुस्लिम वादामुळं देशात दंगल घडवण्याचा प्रकार सुरु असून ही देशासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नितीश-तेजस्वी यांच्या युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. मी पक्षाध्यक्ष आहे, मी निर्णय घेईन, असं ते म्हणाले.
Web Title: Rjd Chief Lalu Yadav Big Statement On Mosque Loudspeaker Controversy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..