Lalu Yadav: खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी

काँग्रेस, टीएमसीनंतर आता राजदही राम मंदिराच्या कार्यक्रमापासून राहणार दूर; लालू यादवांची घोषणा
Lalu Yadav: खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी

नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर राजकीय सोहळा असं संबोधत इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेसनं आपण या सोहळ्याला जाणार नाही, असं जाहीर केलं आहे. त्यात आता राष्ट्रीय जनता दलही या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. (RJD chief Lalu Yadav to skip Ram Mandir Pran Pratistha ceremony)

लालू यादव काय म्हणाले?

"मी अयोध्येला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी जाणार नाही" असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. पण यासाठीचं निश्चित कारण त्यांनी सांगितलं नाही. पण इंडिया आघाडीतील आणखी एका पक्षानं अधिकृतपणे राम मंदिराच्या सोहळ्याला जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. (Latest Marathi News)

Lalu Yadav: खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी
BJP Cluster Meeting: 2024 साठी भाजप अन् मित्र पक्षांच्या उमेदवारांसाठी भाजपच खास प्लॅन; 300 जणांची स्पेशल टीम करणार काम

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे पण त्यांनी देखील आपण जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. आपण २२ जानेवारीनंतर जाऊन राम मंदिरात दर्शन घेऊ पण भाजपनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Lalu Yadav: खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी
Rahul Narvekar: नेमकं चुकतंय कोण? ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला नार्वेकरांनीही दिलं पुराव्यांसह प्रत्युत्तर; वाचा काय म्हणाले?

अशीच भूमिका काँग्रेसचे पक्ष प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार सोनिया गांधी यांनी देखील हा कार्यक्रम भाजपचा राजकीय कार्यक्रम असल्यानं आपण या सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याचं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com