
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे.
राष्ट्रपती भवनात पुतळ्याची गरज नाही; द्रौपदी मुर्मू यांच्यावर तेजस्वी यादवांचा घणाघात
पाटणा : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) उद्या (सोमवार, 18 जुलै) मतदान होणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत, तर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी दिलीय.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (RJD leader Tejashwi Yadav) यांनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्यावर भाष्य करत टीका केलीय. आम्ही त्यांचं (द्रौपदी मुर्मू) बोलणं कधीच ऐकलं नाही. त्यामुळं राष्ट्रपती भवनात कोणत्याही पुतळ्याची (मूर्ती) गरज नसल्याचा टोला त्यांनी मुर्मू यांना लगावलाय. तेजस्वी यादव म्हणाले, राष्ट्रपती भवनाला 'मूर्ती'ची गरज नाहीय. तुम्ही यशवंत सिन्हा यांना अनेकदा बोलताना ऐकलं असेल, पण द्रौपदू मुर्मू यांना बोलताना तुम्ही कधी ऐकलं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा: 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेनं संरक्षण मंत्रालयाचं पाऊल; खासगी कंपन्या बनवणार 'लष्करी हेलिकॉप्टर'
तेजस्वी पुढं म्हणाले, "आम्हा लोकांना राष्ट्रपती भवनात एकही पुतळा (मूर्ती) नकोय. आम्ही राष्ट्रपती निवडतोय. तुम्ही यशवंत सिन्हा यांना सर्वत्र ऐकलं असेल. पण, मुर्मू यांचा आवाज कधी ऐकला आहे का? उमेदवार झाल्यापासून त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असा घणाघातही त्यांनी केलाय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. दरम्यान, विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना राजदनं आधीच पाठिंबा जाहीर केलाय. मात्र, मुर्मू यांच्यावर टीका करणारे तेजस्वी यादव हे पहिले राजकारणी नाहीत. यापूर्वी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी त्यांच्यावर भाष्य केलं होतं.
Web Title: Rjd Leader Tejashwi Yadav Statement On Droupadi Murmu He Says Dont Need A Statue In Rashtrapati Bhawan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..