Gwalior Road Development : रस्ता बांधून पुन्हा खोदला तर बिल रोखणार; सरकारने ठेकेदारांना भरला दम, 'एक रुपयाही मिळणार नाही'

Madhya Pradesh Gwalior roads: ग्वाल्हेरमध्ये २८ रस्त्यांचा कायापालट; आधी सीवर, पाणीपुरवठा व नाले पूर्ण, नंतरच डांबरीकरण; निकृष्ट कामांवर ठेकेदारांचे बिल थेट रोखण्याचा सरकारचा इशारा
Madhya Pradesh Gwalior roads:

Madhya Pradesh Gwalior roads:

sakal

Updated on

मध्य प्रदेश : पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुरवस्था आणि ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या ग्वाल्हेरकरांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या ‘द्वारका नगरी योजने’ अंतर्गत ग्वाल्हेर शहरासाठी २८६.९१ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातील १५५ कोटी रुपयांच्या निधीतून २८ प्रमुख रस्त्यांचा कायापालट केला जाणार आहे.

या कामात केवळ रस्त्यावर डांबराचा थर टाकण्याऐवजी रस्ते सुरक्षा, पाण्याचा निचरा, मलनिस्सारण आणि वाहतूक व्यवस्थापन यांचा एकत्रित विचार केला जाणार आहे. विशेष म्हणजे रस्ता तयार केल्यानंतर पुन्हा सीवर, पाणीपुरवठा किंवा इतर कामांसाठी खोदाई होऊ नये, यासाठी ठेकेदारांवर कडक अटी घालण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com