उपचारांसाठी परदेशी जाण्याची वद्रांनी मागितली परवानगी

वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी वैद्यकीय उपचार आणि व्यवसायाच्या कामासाठी परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात केला आहे. लंडनमध्ये 12, ब्रायन्सटन स्क्वेअर येथे 19 लाख पौंड किमतीची मालमत्ता खरेदी केल्याबद्दल मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत वद्रा यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी वैद्यकीय उपचार आणि व्यवसायाच्या कामासाठी परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात केला आहे. लंडनमध्ये 12, ब्रायन्सटन स्क्वेअर येथे 19 लाख पौंड किमतीची मालमत्ता खरेदी केल्याबद्दल मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत वद्रा यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

ज्येष्ठ विधिज्ञ के. टी. एस. तुलसी हे वद्रा यांची बाजू मांडत आहेत. वद्रा यांनी नऊ डिसेंबरपासून दोन आठवडे स्पेनला जाण्याची परवानगी विशेष न्या. अरविंद कुमार यांच्याकडे मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी नऊ डिसेंबरलाच होणार आहे. त्या वेळी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आपले उत्तर सादर करेल. जूनमध्ये न्यायालयाने आरोग्याच्या कारणास्तव वद्रा यांना सहा आठवड्यांसाठी अमेरिका आणि नेदरलॅंड येथे जाण्याची परवानगी दिली. मात्र, त्यांना ब्रिटनला जाण्यास मज्जाव केला.
 

भाजपचे आता मिशन मुंबई; शिवसेनेला देणार आव्हान

आरोपीला ब्रिटनला जाण्यास परवानगी दिल्यास तेथील पुरावे ते नष्ट करू शकतात, अशी भीती "ईडी'ने व्यक्त केली होती. परवानगीशिवाय देश न सोडण्याच्या अटीवर वद्रा यांना एक एप्रिल रोजी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robert Vadra seeks Delhi court's permission to travel abroad