esakal | भाजपचे आता 'मिशन मुंबई'; महापालिकेत शिवसेनेला आव्हान देणार?
sakal

बोलून बातमी शोधा

BJP-Maharashtra

सत्ता समीकरणाच्या सगळ्या हालचाली झाल्यानंतर आता भाजपनं राज्यात आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. काल जळगावात उत्तर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक झाली. त्यानंतर आज मुंबई विभागाचा आढावा घेण्यात आला.​

भाजपचे आता 'मिशन मुंबई'; महापालिकेत शिवसेनेला आव्हान देणार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भाजपने आगामी निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत करत आढावा बैठका घेण्यास सुरवात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानं भाजपचा तिळपापड झाला आहे. भाजप शिवसेनेला जमेल तिथं आव्हान देण्याची शक्यता आहे. अनेक वर्षे मुंबई शिवसनेच्या हातात असल्यानं तिथं धक्का देण्याचा भाजपचा इरादा असल्याचं दिसत आहे. 

- कायदे करून काही होत नाही, मानसिकता बदला : उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू

आज मुंबईत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर मुंबईतील वसंत स्मृती येथे पत्रकार परिषद घेत बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती दिली. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, आज झालेल्या बैठकीत मुंबई विभागाचा आढावा घेण्यात आला. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप सर्वाधिक जागांवर विजय मिळवेल आणि मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल, असा विश्वास आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत भाजप मुंबई अध्यक्षपदाची घोषणाही करण्यात येईल.

- फडणवीसांनी घेतले कुलदैवताचे दर्शन; 'या' गोष्टीसाठी मागितले आशीर्वाद

एकनाथ खडसेंबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, काल उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक जळगाव येथे घेतली. यावेळी अनेक गोष्टींवर चर्चा झाली. महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढविण्यात आणि संघटन मजबूत करण्यात खडसेंचा महत्त्वाचा वाटा आहे. खडसे पक्ष सोडण्याचा विचार करणार नाहीत, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. 

- Unnao Rape Case : पोलिसांच्या मध्यस्तीनंतर कडेकोट बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार!

सत्ता समीकरणाच्या सगळ्या हालचाली झाल्यानंतर आता भाजपनं राज्यात आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. काल जळगावात उत्तर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक झाली. त्यानंतर आज मुंबई विभागाचा आढावा घेण्यात आला.

मुंबई महापालिकेत असे आहे संख्याबळ : (2017 महानगरपालिका निवडणूक)

1) शिवसेना : 84 जागा

2) भाजप : 82 जागा

3) काँग्रेस : 31 जागा

4) राष्ट्रवादी काँग्रेस : 9 जागा

5) मनसे : 7 जागा

6) समाजवादी पक्ष : 6 जागा

7) एमआयएम : 2 जागा

8) अपक्ष : 6 जागा

loading image