रेल्वेत दहावी आणि ITI उत्तीर्णांसाठी बंपर भरती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

रेल्वे ट्रेड अप्रेंटिसच्या (प्रशिक्षणार्थी) माध्यमातून 432 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी काही पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्वरा करा....

नवी दिल्ली : सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण भारतीय रेल्वेच जागा निघाल्या आहेत. रेल्वे ट्रेड अप्रेंटिसच्या (प्रशिक्षणार्थी) माध्यमातून 432 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी काही पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक उमेदवार 15 जुलैला सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करु शकतील. 

या प्रक्रियेतून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती साउथ ईस्टर्न सेंट्रल रेल्वेच्या बिलासुर छत्तीसगड विभागात होईल. जर आपल्यालाही या पदांसाठी अर्ज भरायचा असेल तर खाली दिलेल्या माहितीला नीट वाचल्यानंतरच प्रक्रियेला सुरवात करावी. 

ट्रेडची नावे आणि संख्या :
कोपा - 37
स्टेनोग्राफर (इंग्रजी)  - 08
स्टेनोग्राफर (हिंदी) - 08
फिटर - 32
इलेक्ट्रीशियन- 19
वायरमॅन - 19
इलेक्ट्रॉनिक/मॅकेनिक - 02
आर. ए. सी मॅकेनिक - 02
वेल्डर - 16
प्लंबर - 03
मेसन - 03
पेंटर - 03
कारपेंटर - 03
मशीनिष्ट - 03
टर्नर - 03
शीट मेटल वर्कर - 03

एकुण पदांची संख्या : 164 पदे

पात्रता : उमेदवाराने 10 वी पास असणे गरजेचे आहे. उमेदवार ज्या ट्रेडसाठी अर्ज भरणार असेल त्या ट्रेडमधील ITI सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे गरजेचे आहे. 

वयाची अट : 1/07/2019 पर्यंत 15 वर्षापेक्षा कमी आणि 24 वर्षापेक्षा जास्त उमेदवाराचे वय नको.

याआधारे होणार निवड : उमेगदवारांची निवड 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होईल. अधिक माहितीसाठी ऑफिशियल नोटिफिकेशन बघावे. 

अर्ज करण्याची प्रक्रिया : इच्छूकांनी www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज करावे. 

ऑफिशियल नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RRB railway recruitment 2019 for apprentice posts all details are here