काँग्रेसच्या मनरेगा रोपट्याला केंद्राकडून संजीवनी

वृत्तसंस्था
Sunday, 17 May 2020

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या ज्या मनरेगा योजनेवर भाजपने आजवर प्रचंड टीका केली. त्याच मनरेलासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची घोषणा, आज पुन्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. 

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या ज्या मनरेगा (महात्मा गांधी नॅशनल रोजगार गॅरंटी) योजनेवर भाजपने आजवर प्रचंड टीका केली. त्याच मनरेलासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची घोषणा, आज पुन्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 लाख कोटी रुपयांच्या घोषणेचा पाचवा आणि शेवटचा टप्पा सांगितला. आज, झालेल्या पत्रकार परिषदे त्यांनी आरोग्य, शिक्षण, व्यापार, कंपनी कायदा या सारख्या क्षेत्रांमध्ये केलेल्या सुधारणांची माहिती देताना मनरेगाच्या तरतुदीवर विशेष भर दिला. अर्थमंत्र्यांन 20 लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर पॅकेजी संपूर्ण फोड करून सांगताना, वेगवेगळ्या विभागांसाठी केलेल्या विशेष तरतुदीची महिती दिली.
-----------
पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण
-------
पुणे शहराच्या किमान तापमानात झाली वाढ; पुढील सहा दिवस...
------

मनरेगा कशासाठी?
कोरोना व्हायरसचा धोका आणि शहरातल्या लॉकडाउनमुळं गेलेला रोजगार या पार्श्वभूमीवर लाखो मजूर आणि कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. या मजूरांच्या हाताला गावी गेल्यानंतर काम मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पुन्हा मनरेगाला संजीवनी दिली आहे. सध्या मनरेगासाठी 61 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यात आता 40 हजार कोटी रुपयांची भर टाकण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

निर्मला सीतारामन यांनी दिलेली माहिती
देशातील 20 कोटी लोकांच्या जनधन खात्यात मदत जमा झाली 16 मेअखेर 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन-दोन हजार रुपये जमा उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गरजू कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला बांधकाम मजुरांच्या खात्यात आतापर्यंत 50 कोटी रुपयांची मदत देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 40000 crore increase in allocation for MGNREGA for job boost FM Sitharaman