देशभरात RSS ची पाच नवीन विद्यापीठे उघडणार; शिक्षणात बदल घडवण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RSS University

'नवीन विद्यापीठांचं उद्दिष्ट शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणणं हा आहे.'

देशभरात RSS ची पाच नवीन विद्यापीठे उघडणार; शिक्षणात बदल घडवण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संलग्न विद्या भारती (Vidya Bharti) देशभरात पाच नवीन विद्यापीठे (RSS University) तयार करणार आहे. विद्या भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव यतींद्र शर्मा (Yatindra Sharma) यांनी हरिद्वार, उत्तराखंड इथं झालेल्या एका कार्यक्रमात याची पुष्टी केलीय.

यतींद्र शर्मा म्हणाले, नवीन विद्यापीठांचं उद्दिष्ट शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणणं आहे. देशातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आता RSS च्या उच्च शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं हा याचा उद्देश आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Rajasthan : मी ठरवलं तर आमदारांना सोबत आणण्याची जबाबदारी माझी असेल; सचिन पायलटांचा मोठा दावा

आरएसएसनं यापूर्वीच कर्नाटकातील बंगळुरु इथं चाणक्य विद्यापीठ उघडलं आहे. तर गुवाहाटी, आसाम इथं आणखी एका आरएसएस विद्यापीठावर काम सुरू आहे. बंगळुरू येथील विद्यापीठाच्या पहिल्या बॅचसाठी एकूण 200 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यापीठात विद्या भारती शाळांमधील सुमारे 50 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. RSS द्वारे चालवल्या जाणार्‍या शैक्षणिक संस्था सर्व वर्ग, जाती आणि पंथाच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. RSS च्या 29,000 शाळांमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा: PFI वर पुन्हा मोठी कारवाई; 8 राज्यांत 200 ठिकाणी छापे, 170 जण ताब्यात

RSS संलग्न विद्या भारतीनं अलीकडंच केंद्रानं सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल (NEP) जागरुकता वाढवण्याची मोहीम जाहीर केलीय. या मोहिमेचा उद्देश 'भारत केंद्रित शिक्षण'च्या पैलूंवर प्रकाश टाकणं हा आहे. 11 सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झालीय.