सरसंघचालक मोहन भागवत ट्विटरवर; 'या' एकमेव खात्याला करतात फॉलो!

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जुलै 2019

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देखील आता ट्विटरवर आपले खाते काढले आहे. मोहन भागवत यांचं ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड आहे. पण, त्यांनी अद्याप एकही ट्विट केलेले नाही. मोहन भागवत यांनी कोणत्याही खात्याला फॉलो केलेले नसून ते आरएसएसच्या एकमेव व्हेरिफाईड खात्याला फॉलो करत आहेत.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देखील आता ट्विटरवर आपले खाते काढले आहे. मोहन भागवत यांचं ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड आहे. पण, त्यांनी अद्याप एकही ट्विट केलेले नाही. मोहन भागवत यांनी कोणत्याही खात्याला फॉलो केलेले नसून ते आरएसएसच्या एकमेव व्हेरिफाईड खात्याला फॉलो करत आहेत.

दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांना फॉलो करणारा मोठा वर्ग देशात आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्विटर हे चांगलं माध्यम ठरू शकते. त्यामुळे मोहन भागवत यांनी आपलं ट्विटर अकाऊंट सुरू केलं असावं असे बोलले जात आहे.

सध्या देशातील बराचसा वर्ग हा सोशल मीडियावर असतो. आपली गोष्ट एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर हा प्रभावी ठरत आहे. त्यामुळे मोहन भागवत यांची ट्विटरवरील एन्ट्री देखील तितकीच महत्त्वाची मानली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Chief Mohan Bhagwat Join Twitter