नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेने भारतावर लागू केलेल्या ५० टक्के टॅरिफवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवत म्हणाले की, आपले आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत आरएसएस प्रमुखांनी, आपल्याला स्वदेशीला प्रोत्साहन द्यावे लागेल.. असं म्हटलं.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, पर्यावरणासाठी तीन गोष्टींवर काम करावे लागेल- पाणी वाचवा, सिंगल यूज प्लास्टिक हटवा आणि झाडे लावा. सामाजिक समरसतेसाठी काम करावे लागेल. माणसाकडे पाहताना आपण जातीबद्दल विचार करतो, हे मनातून काढून टाकावे लागेल.