Mohan Bhagwat: आमच्या भूमीत हिटलर असूच शकत नाही, जर असला तरी...; भागवत यांचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mohan bhagwat

Mohan Bhagwat: आमच्या भूमीत हिटलर असूच शकत नाही, जर असला तरी...; भागवत यांचं विधान

नवी दिल्ली - भारताची राष्ट्रवादाची संकल्पना ही 'वसुधैव कुटुंबकम'वर आधारित असून त्यामुळे अन्य कोणत्याही देशाला त्याचा धोका नाही. त्यामुळे येथे हिटलर असूच शकत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

हेही वाचा: ...तर तुम्हाला पंतप्रधान, राष्ट्रपतीही वाचवू शकणार नाही; मिथून चक्रवर्तींचा ममतांना इशारा

ते म्हणाले, ''आमचा राष्ट्रवाद इतरांना धोका निर्माण करत नाही. तो आमचे स्वभाव नाही. आमच्या राष्ट्रवाद आम्हाला संपूर्ण जग एक परिवार आहे हे शिकवतो. (वसुधैव कुटुम्बकम). जगभरातील लोकांमध्ये ही भावना वाढीस लागण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे, भारतात हिटलर असूच शकत नाही. मात्र तरी देखील हिटलर असेल तर लोक त्यांना बाहेर फेकून देतील.

भारताची राष्ट्रवादाची संकल्पना इतर देशांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे, अनेक देशांचा राष्ट्रवाद एकतर धर्मावर किंवा एका भाषेवर किंवा जनतेच्या समान स्वार्थावर आधारित आहे, सरसंघचालक म्हणाले की, विविधता प्राचीन काळापासून भारताच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा एक भाग आहे.

हेही वाचा: Congress : दोन दशकांनंतर काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

"वेगवेगळ्या भाषा आणि देवाची उपासना करण्याचे विविध मार्ग आपल्यासाठी नैसर्गिक आहेत". ही जमीन केवळ अन्न आणि पाणीच देत नाही तर मूल्यही देते. म्हणूनच आपण याला भारत माता म्हणतो. ही जमीन आमच्या मालकीची नाही, आम्ही या भूमीचे मुले आहोत. ही आपली पवित्र भूमी, कर्मभूमी आहे, त्यामुळे आपण सर्व एक आहोत, असं मोहन भागवत यांनी म्हटलं.