esakal | RSS: ड्रग्ज, OTT, बिटकॉईन; विजयादशमी कार्यक्रमात काय म्हणाले मोहन भागवत?
sakal

बोलून बातमी शोधा

RSS: ड्रग्ज, OTT, बिटकॉईन; काय म्हणाले मोहन भागवत?

RSS: ड्रग्ज, OTT, बिटकॉईन; काय म्हणाले मोहन भागवत?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा होत आहे. दसऱ्याच्या दिवशी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. नागपूरमध्ये यंदाचा हा सोहळा मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'शस्त्र पूजा' केली आहे. मोहन भागवत यांनी अनेक बाबींवर भाष्य केलंय. स्व आपण विसरुन चाललो असून आपण त्याची जागृती केली पाहिजे. आपण आपल्या स्वातंत्र्याचा आणि फाळणीचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. पुन्हा आपण विभाजित होऊ नये, यासाठी हा इतिहास आपल्याला माहिती हवा. दोन राज्यांतल्या संघर्षावरही त्यांनी बोट ठेवलंय. ओटीटी प्लॅटफॉर्मचं नियंत्रण आणि ड्रग्जच्या व्यसनावरही त्यांनी निशाणा साधलाय.

दोन राज्यांत संघर्ष का?

यावेळी मोहन भागवत यांनी अनेक गोष्टींवर निशाणा साधला आहे. त्यांनी दोन राज्यांमधल्या संघर्षावर भागवतांनी बोट ठेवलंय. दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये संघर्ष होतो? आपल्या राजकारणासाठी सरकारांमध्ये संघर्ष का होतो? असा सवाल त्यांन उपस्थित केलाय. त्यांनी पुढे म्हटलंय की, आपल्या संविधानामध्ये आपण एका भारताचे लोक असल्याचं म्हटलंय. ही व्यवस्था फेडरल आहे. लोक फेडरल नाहीयेत, हेही त्यांनी सांगितलंय.

ओटीटी, ड्रग्ज आणि बिटकॉईनवर अनियंत्रित

पुढे ते म्हणाले की, देशात अराजकता माजावी, असे प्रयत्न सुरु आहेत. नव्या तंत्रज्ञानावर कसलंही बंधन नाहीये. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कसली कसली चित्रे येतात. लॉकडाऊनमध्ये मुलांच्या हातात मोबाईल होता. ते काय पाहत होते? यावर काही नियंत्रण नाही. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर होतोय. बिटकॉईन चलनावर कुणाचं नियंत्रण आहे? ड्रग्जचा व्यापार त्याचा पैसा कुठे जातो हे आपल्याला माहितीये. देशविरोधी कारवायांसाठी तो पैसा जातो. अनियंत्रित गोष्टी वाढताहेत. बिटकॉईनसारख्या गोष्टी वाढताहेत. कोणत्या देशाचं नियंत्रण आहे, हे मला माहीती नाही. ड्रग्जच्या व्यसनांचं निराकरण व्हावं, हे शासनाने केलं पाहिजे.देशात व्यसनाधीनता वाढतेय. सरकार करेल तेंव्हा करेल तोवर मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक... विदेशी भाषेत नको तर आपल्या मातृभाषेत सही हवी. स्वभाषा, स्वभुषा, अवलंबायला हवं.

मोहन भागवत यांनी आपल्या मनोगताची सुरुवात करताना म्हटलंय की, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण स्वाधीन झालो आहोत. स्व च्या आधारावर तंत्राधारे चालणारी प्रक्रिया सुरु आहे. स्वातंत्र्य कशासाठी हवीय, या मुद्यावर देखील त्याकाळी संघर्ष झाला आहे. यासाठी अनेकांनी बलिदानाचा हिमालय उभा केला होता. महात्मा गांधींनी सत्याग्रहाची सुरुवात चिमूटभर मीठ उचलून केला म्हटलं जातं की त्यामुळे इंग्रजांची सत्ता डळमळली होती. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेकांमध्ये अशा अनेक गोष्टी समान आढळतात.

स्व ची कल्पना कालांतराने अस्पष्ट झाली. स्व काय आहे, हेच आपण हरवून बसलो. स्व चे विस्मरण झाले आहे. स्वजनांनाही विसरुन गेलो आणि आपापसातले भेद इतके वाढले की आपण जर्जर झालो. स्व चे विस्मरण झालं. म्हणूनच त्या काळच्या आव्हानासमोर आपण ठामपणे उभं राहू शकलो नाही त्याचा फायदा विदेशी लोकांनी घेतला.

स्वातंत्र्यावेळी देशाचं विभाजन झालं. तो अत्यंत दुखद इतिहास आहे. तो इतिहास जाणून घेतला पाहिजे. शत्रूता आणि फुटीरता आपल्याला पुन्हा नकोय. मात्र, तो इतिहास नव्या पीढीने जाणून घेतला पाहिजे.ती पुनरावृत्ती आपल्याला नकोय मात्र, इतिहासात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी. भेदरहित समताधिष्ठीत समाज हे आपलं स्वप्न आहे. आपण भेदभावाने जर्जर होतो म्हणूनच आपण गुलाम झालो. यासाठीच मूळ जो आपला स्व आहे, त्याप्रमाणे आत्मीयतापूर्ण व्यवहार व्हायला हवा. हरवलेली अखंडता परत मिळवण्यासाठी जुना इतिहास जाणून घ्यायला हवा.

विषमतामूलक समाज काढून टाकून समताधिष्ठीत समाजासाठी अनेकांनी प्रयत्न केलेत. व्यवस्था बदलण्याबरोबरच त्याआधी ती मनातून जायला हवी. भेदभावाची भावना मनातून जायला हवी. व्यवस्थेसोबतच मनाला बदलण्याचा प्रयत्न व्हायला हवा. लोकांना एकमेकांना जोडण्याची आणि प्रेमाची भाषा हवी. सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून स्वयंसेवक काम करत आहेत. सगळ्या प्रांतात प्रयत्न सुरु आहेत. परंतु मनातून जाण्यासाठी भेटायला हवं. अनौपचारिक रित्या भेटायला हवं. समाज तोडणारी नव्हे तर जोडणारी भाषा हवी. अनौपचारिक पारिवारीक संबंध व्हायला हवेत. हे काम संघस्वयंसेवक करत आहेत. भेदरहित समता धिष्टीत समाज हा स्वातंत्र्याची गॅरंटी आहे.

प्राचीन काळापासून अनेक उदाहारणे आहेत. श्री गुरु तेग बहादुर यांचं बलिदान कशासाठी होतं? या अखंडतेच्या परंपरेसाठीच होतं. त्यांनी आपल शीर दिलं मात्र त्यांनी पूजेची जबरदस्ती सहन केली नाही. ज्ञानेश्वरांनी ही कल्पना पसायदानात केली आहे. सर्वांच्या सुखाची कल्पना केली आहे. दुष्टांचं दुष्टपण जावं, हीच इच्छा व्यक्त केली आहे. सर्वांचं दुख कमी होवो. रविंद्रनाथ टागोरांनीही हीच गोष्ट सांगितलीय. सावरकर यांनी म्हटलंय की, असा हिंदू समाज उभा राहिला तर तो वसुधैव कुटुंबकमच म्हणेल.

loading image
go to top