esakal | Delhi Violence : तर आपणच जबाबदार - मोहन भागवत (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

RSS Chief at Navvarsh 2020 event in Nagpur comment about delhi violence

सीएएवरून सुरू असलेल्या हिंसक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या देशात काहीही घडलं तरी आपणंच जबाबदार आहोत. काही वर-खाली झालं तर आता ब्रिटीशांना दोष देऊ शकत नसल्याचेही भागवत यांनी म्हटले आहे.

Delhi Violence : तर आपणच जबाबदार - मोहन भागवत (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सीएएवरून सुरू असलेल्या हिंसक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या देशात काहीही घडलं तरी आपणंच जबाबदार आहोत. काही वर-खाली झालं तर आता ब्रिटीशांना दोष देऊ शकत नसल्याचेही भागवत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता आपण स्वतंत्र झालो आहोत. आज आपल्या देशात आपलं राज्य आहे. राज्याचं स्वातंत्र्य टिकून राहावे आणि राज्य सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी सामाजिक आणि नागरिक अनुशासन अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले. ते पुढे जाऊन म्हणाले, जेव्हा आपण गुलामगिरीत होतो, तेव्हा जे काही होत होतं ते आता चालणार नाही. नागरिक अनुशासन आणि सामाजिक अनुशासनाची सवय अशा कार्यक्रमांमधून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

'पाच हजार वर्षात एकाही हिंदू राजाने मशीद पाडली नाही' - गडकरी

स्वातंत्र्यापूर्वी भगिनी निवेदिता यांनी आपणा सर्वांना सतर्क केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार देशभक्तीची दैंनदिन जीवनातील अभिव्यक्ती नागरिकत्व अनुशासनाचे पालक करण्याची असते. आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी आंबेडकरांच्या भाषणाचा उल्लेख केला. स्वतंत्र भारताचे संविधान सादर करताना आंबेडकरांनी संसदेत दोन भाषणं केली होती. या भाषणांमध्ये त्यांनी ज्या बाबींचा उल्लेख केला होता ती हीच बाब असल्याचेही भागवत यांनी सांगितले.

भागवत पुढे म्हणाले, आपल्या देशात आता जे काही होईल त्याला आपणच जबाबदार असू. यासाठी आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बराच विचार करायला हवा. जेव्हा आपण गुलामगिरीत होतो, तेव्हा जे काही होत होतं ते आता चालणार नाही. नागरिक अनुशासन आणि सामाजिक अनुशासनाची सवय आपल्याला व्हायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे.