RSS With Muslims: गैरहिंदुंना संघ आणणार आपल्या विचारसरणीत? मोहन भागवतांनी दिले महत्त्वाचे निर्देश

RSS chief Mohan Bhagwat praises PM Narendra Modi
RSS chief Mohan Bhagwat praises PM Narendra Modi

RSS With Muslims: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना जे हिंदू नाहीत, अशा विचारसरणीच्या लोकांना आपल्या विचारसरणीशी जोडून घ्यावे, असे सांगितले आहे.

अवध प्रांताच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितले की, मुस्लिम, सिख, जैन आणि इतर समुदायाच्या लोकांना आपल्या विचारसरणीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.

RSS chief Mohan Bhagwat praises PM Narendra Modi
Ban RSS In Canada : कॅनडात आरएसएसवर बंदी घालण्याचा दावा : नेमकं खरं काय? जाणून घ्या

यामुळे आता भारतीय जनता पक्षाप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील मुसलमानांना आपल्या सोबत सामावून घेण्याचे कार्य करत असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पसमंडा मुसलमानांशी चर्चा केली होती.

याचबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा मंच आधीपासूनच मुसलमानांमध्ये काम करत आहे. मात्र आता स्वयंसेवक संघाला या मंचाची व्याप्ती वाढवायची असून संघ या कामाला लागला आहे.

आपली कट्टर हिंदू प्रतिमा आरएसएस तोडण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आरएसएस प्रत्येक पंथात समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय आरएसएसने दलित समाजातही काम करण्याचे सुरुवात केली आहे. यासाठी संघात वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत.

हिंदूं व्यतिरिक्त इतर समाज कशाप्रकारे आपल्याकडे वळेल यासाठी ब्लू प्रिंट तयार झाली आहे. ब्लू प्रिंट प्रमाणे ख्रिश्चन, मुस्लिम, सिख व इतर धर्माच्या लोकांना संघाचे कार्यकर्ते भेटतील. या सर्व धर्मांच्या प्रार्थना स्थळांवरही बैठक होणार आहे,

RSS chief Mohan Bhagwat praises PM Narendra Modi
Rahul Gandhi Latest News : देशात प्रत्येक संघटनेत RSS चे लोक, मंत्रालयातही हस्तक्षेप; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com