संघाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी (आरएसएस) निगडीत मुस्लिम राष्ट्रीय मंचने रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत मुस्लिम देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. 

मुंबई - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी (आरएसएस) निगडीत मुस्लिम राष्ट्रीय मंचने रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत मुस्लिम देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. 

३० देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांशिवाय मुस्लिम समाजातील २०० प्रतिष्ठित लोकांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर समाजातील १०० पाहुणेही यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे, अशी मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोरे यांनी सांगितले आहे. येत्या ४ जूनला सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये ही इफ्तार पार्टी होईल असे सांगण्यात येत आहे. मुस्लिम समाजात संघाविषयी असणारी द्वेषाची भावनी कमी व्हावी या उद्देशाने मुस्लिम राष्ट्रीय मंचाकडून वारंवार अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

देशातील पश्चिम आणि दक्षिण भागातील मुस्लिमांपर्यंत पोहोचणे हे मुंबईत इफ्तार पार्टी आयोजित करण्यामागचे संघाचे उद्धिष्ठ असल्याचे सांगण्यात येते. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांशी चर्चा करू इच्छा पाचपोरे यांनी व्यक्त केली आहे.

देशात याआधीही भाजप किंवा आरएसएस कडुन मुस्लिम समाजाशी निगडीत कार्यक्रम घेण्यात येत होते. परंतु ते केवळ उत्तर भारतापुरतेच मर्यादित असायचे. संघाकडून मुंबईत घेतला जाणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. 

Web Title: Rss Host First Iftar Party In Mumbai