esakal | दिल्लीत संघनेत्यांची यूपी निवडणूक, अर्थव्यवस्थेवर चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Mohan Bhagwat

दिल्लीत संघनेत्यांची यूपी निवडणूक, अर्थव्यवस्थेवर चर्चा

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वरिष्ठ नेत्यांची (Leader) महत्वपूर्ण बैठक (Meeting) आजपासून राजधानीत (Delhi) सुरू झाल्याची माहिती कळते. सरसंघचालक मोहन भागवत, (Mohan Bhagwat) सरकार्यवाह दत्ताजी होसबळे, ज्येष्ठ संघ नेते भैय्याजी जोशी आणि पाचही सहसरकार्यवाह या बैठकीला उपस्थित आहेत. (RSS Leaders Discussion on UP Election and Economy in Delhi)

बैठकीत अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे बसलेला फटका, कोरोना व्यवस्थापनात केंद्र सरकार व भाजपशासित राज्य सरकारांच्या हाताळणीतील दोष व उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत मंथन होणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय या बैठकीत पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरचा हिंसाचार, अर्थव्यवस्थेची स्थिती, कोरोनाकाळात संघ बैठका कशा घ्यायच्या आदी विषयांवरही संघनेते चर्चा करणार आहेत.

हेही वाचा: अख्या कर्नाटकात पोलिसांचा सापळा : 36 हजार फोन नंबर, 700 संशयित

ही संघाची अनौपचारिक बैठक असून ती नियमितपणे होते ,असे संघाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या आदल्या वर्षी दिल्लीत बैठक घेण्यामागील योगायोग सूचक आहे. भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनाही प्रसंगी बैठकीत एका सत्रात बोलावण्याची शक्यता आहे. वरिष्ठ फळीतील संघ नेत्यांच्या बैठकीत देशाची परिस्थिती व संघकार्य याबाबत चर्चा होते. मात्र दिल्लीतील या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर राजकीय विषयांची छाप अपरिहार्य असल्याचे सूत्रानी मान्य केले. उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये निवडणुका आहेत. योगी सरकार अंतर्गत वादांनी ग्रासले आहे. कोरोना व्यवस्थापनातील गोंधळामुळे सरकारबद्दल नाराजी आहे. त्यामुळे संघाने त्या राज्यात भाजपला मदतीचा हात देण्याचे ठरविल्याचे स्पष्ट आहे. होसबळे व संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी लखनौचा दौरा केला. त्यांचा फीडबॅक संघनेतृत्वाला दिला जाईल व नंतर भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करून उत्तर प्रदेशाच्या रणधुमाळीबाबत संघाच्या रणनीतीची बंदद्वार आखणी केली जाईल, असे सांगितले जात आहे.

योग्य आखणी केल्यास यूपीत विजय

संघसूत्रांच्या म्हणण्यानुसार, २०१७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीआधी काही महिने नोटाबंदी करण्यात आली होती. त्याचा फटका भाजपला उत्तर प्रदेशात बसेल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात भाजपला दणदणीत विजय मिळाला. त्यामुळे उत्तर प्रदेशात आतापासूनच योग्य आखणी केली तर विजय अशक्य नाही.

loading image