मोहन भागवत यांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; बालक ठार

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सहा वर्षीय बालक जागीच ठार झाला.

जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सहा वर्षीय बालक जागीच ठार झाला. राजस्थानातील तिजारामधून परतत असताना हरसोली-मुंडावरील रस्त्यावर हा अपघात झाला. 

मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारने ज्या दुचाकीला धडक दिली. ती दुचाकी स्थानिक सरपंच चेत्राम यादव यांची असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात चेत्राम यादव गंभीर जखमी झाले आहेत.  त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेत्राम यादव हे त्यांचा नातू सचिनसह दुचाकीवरुन जात होते. या अपघातात सचिनचा मृत्यू झाला. मोहन भागवत हे संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीसाठी राजस्थानला आले होते. कार्यक्रम आटोपून जात असताना हा अपघात झाला.

दरम्यान, यापूर्वी मे महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भागात अपघात झाला होता. त्यानंतर आता हा अपघात झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Mohan Bhagwat car Accident A Boy Killed