
RSS Latest News: काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एखाद्या मशिदीत किंवा मुस्लिम वस्तीत जाऊन संवाद साधेल, असा कोणी विचारही कोणी केला नसेल. पण आता हे प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. खुद्द सरसंघचालक मोहन भागवत हे मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहेत. हरियाणा भवनात नुकतीच ५० मुस्लिम धर्मगुरूंसोबत झालेली बैठक याचे ताजे उदाहरण आहे. यावेळी भागवतांनी त्यांच्या समस्या आणि विचार ऐकून घेतले.