Ayodhya Verdict : निकालानंतर सरसंघचालक भागवत करणार देशाला संबोधन

वृत्तसंस्था
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

आरएसएसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'सर्वोच्च न्यायालय द्वारा श्री रामजन्मस्थान मंदिर वाद के निर्णय के पश्चात आज दोपहर 1 बजे, सरसंघचालक श्री मोहन भागवत दिल्ली में केशवकुंज परिसर, झंडेवालान में मीडिया के माध्यम से राष्ट्र को संबोधित करेंगे।' असे ट्विट करण्यात आले आहे

नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालय आज (ता. 9) निकाल देणार आहे. न्यायालय सकाळी साडेदहा वाजता निर्णय देण्याची शक्‍यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने 40 दिवसांच्या सुनावणीनंतर 16 ऑक्‍टोबरला या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दुपारी एक वाजता जनतेला संबोधित करतील. 

रामजन्मभूमीचा आज निकाल

आरएसएसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'सर्वोच्च न्यायालय द्वारा श्री रामजन्मस्थान मंदिर वाद के निर्णय के पश्चात आज दोपहर 1 बजे, सरसंघचालक श्री मोहन भागवत दिल्ली में केशवकुंज परिसर, झंडेवालान में मीडिया के माध्यम से राष्ट्र को संबोधित करेंगे।' असे ट्विट करण्यात आले आहे. बाबरी मशिदीचा ढाचा जमिनदोस्त करण्यात कारसेवकांचा मोठा वाटा होता. राम मंदिराचा निकाल काय लागणार याकडे देशाचे लक्ष लागलेले असतानाच, भागवत काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सरसंघचालक मोहन भागवत दुपारी 1 वाजता दिल्लीतील केशवकुंज परिसरातील झंडेवालान येथे माध्यमांच्यामार्फत देशाला संबोधित करतील. भागवत काय बोलणार, याकडे स्वयंसेवकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.   

सहा हजार लोकांना रेड कार्ड
उत्तर प्रदेश पोलिसांनी बरेली विभागामध्ये सहा हजार लोकांना रेड कार्ड बजावले असून, त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येईल. या सगळ्या मंडळींना समाजकंटकांच्या यादीत टाकण्यात आले आहे. बरेली झोनमध्ये शहाजहाँपूर, बदायूँ, पिलिभीत, रामपूर, मुरादाबाद, संभळ, अमरोहा यांचा समावेश असून, बिजनौरमध्ये चार हजार लोकांना रेड कार्ड बजावण्यात आले आहे. राज्यातील ९० विविध स्थळांना संवेदनशील स्थळांच्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Sarsanghachalak Mohan Bhagwat will talk to the nation on ayodhya verdict