
राजस्थान: भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या बारमेर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात आरटीआय कार्यकर्त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. अमराराम गोडारा (RTI Activist Amraram Godara) यांचं अपहरण करून हल्लेखोरांनी बेदम मारहाण करून अमानुष छळ केला. हल्लेखोरांनी आरटीआय कार्यकर्त्याचे दोन्ही पाय आणि एक हात तोडला. एवढंच नाही तर क्रौर्याची सीमा ओलांडत त्यांच्या पायाला खिळा ठोकला, सळई घुसवली, मुत्र पाजलं आणि तशा अवस्थेत गावाजवळ फेकून दिलं. राजस्थानमध्ये (Rajasthan) झालेल्या घटनेची देशभरात चर्चा सुरू आहे.
आरटीआय कार्यकर्ते अमराराम गोडारा हे दारू माफियांविरोधात पोलिसांना सातत्याने माहिती देत होते. यासोबतच ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांबाबतही ते आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करत होते. मंगळवारी सायंकाळी अमराराम जोधपूरहून आपल्या गावी येत होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण केली.
मारहाण करून हल्लेखोरांनी अमरारामचे दोन्ही पाय आणि एक हात तोडला. त्यानंतर त्यांच्या पायात खिळे ठोकले. याच अवस्थेत गावाजवळ फेकून दिलेल्या अमरराम यांच्याबद्दल गावातील लोकांना माहिती मिळताच लोकांनी अमरारामला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र अमराराम यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं प्राथमिक उपचारानंतर गंभीर अवस्थेत त्यांना जोधपूरला हालवण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.