Uttarakhand CM orders high-level probe and coordination centre after Rudraprayag helicopter crash kills 7 pilgrims : रुद्रप्रयागमध्ये रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर आता चार धाम यात्रेसाठी चालवली जाणारी हेलीकॉप्टर सेवा सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हेलीकॉप्टर उड्डाणांचे संचालन सुनिश्चित करण्यासाठी देहरादून येथे 'कमांड आणि कोऑर्डिनेशन सेंटर' स्थापन येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.