September Rule Change : आजपासून होणार 'हे' 5 मोठे बदल, जाणून घ्या कोणते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

September Month Rule Change

1 सप्टेंबरपासून कोणते विशेष बदल झालेत, ते आपण जाणून घेऊ...

September Rule Change : आजपासून होणार 'हे' 5 मोठे बदल, जाणून घ्या कोणते

September Month Rule Change : आजपासून सप्टेंबर महिना (September Month) सुरू झाला असून पहिल्या तारखेपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते बँकिंग नियमांपर्यंत अनेक बदल लागू करण्यात आले आहेत. याशिवाय, टोल टॅक्सपासून ते जमीन खरेदीपर्यंत आता जास्त खर्च करावा लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून कोणते विशेष बदल झालेत, ते आपण जाणून घेऊ...

एलपीजी किमतीत कपात : पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत बदल करतात. यावेळी कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिलाय. एलपीजीच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्यात आलीय. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आलीय. 1 सप्टेंबर 2022 पासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या सिलेंडरची (LPG Cylinder) किंमत 91.50 रुपये, कोलकात्यात 100 रुपये, मुंबईत 92.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 96 रुपयांनी कमी झालीय.

हेही वाचा: Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर 25 लाख, 'D' कंपनीच्या टोळीवर 20 लाखांचं बक्षीस जाहीर : NIA

टोल टॅक्स : आजपासून तुम्हाला जास्त टोल टॅक्स (Toll Tax) भरावा लागेल. 1 सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन दरवाढीनुसार कार, जीप, व्हॅन आणि इतर हलक्या मोटार वाहनांसाठी टोल टॅक्सचा दर 2.50 रुपये प्रति किमीवरून 2.65 किमी करण्यात आलाय. म्हणजेच, प्रति किलोमीटर 10 पैशांची वाढ झालीय.

विमा प्रतिनिधींना झटका : IRDAI नं सामान्य विम्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. आता विमा एजंटला 30 ते 35 टक्क्यांऐवजी केवळ 20 टक्के कमिशन मिळणार आहे. त्यामुळं एजंटांना झटका बसला आहे. मात्र, लोकांच्या प्रीमियमच्या रकमेत कपात होऊन मोठा दिलासा मिळणार आहे. कमिशन बदलाचा नियम 15 सप्टेंबर 2022 पासून लागू होईल.

हेही वाचा: Sopore Encounter : सोपोरमध्ये जोरदार चकमक; जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

PNB KYC अपडेट्सची अंतिम मुदत संपली : पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना बऱ्याच काळापासून KYC अपडेट करण्यास सांगत आहे. केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत आजपासून संपलीय. हे काम पूर्ण करण्यासाठी बँकेनं 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली होती.

NPS च्या नियमांमध्ये मोठे बदल : 1 सप्टेंबरपासून आणखी एका मोठ्या बदलाबद्दल बोलायचं झालं, तर तो बदल राष्ट्रीय पेन्शन योजनेत (National Pension Scheme) करण्यात आलाय. आजपासून NPS खाते उघडल्यावर पॉइंट ऑफ प्रेझेन्स (POP) वर कमिशन दिलं जाणार आहे. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबर 2022 पासून हे कमिशन 10 ते 15,000 रुपयांपर्यंत असणार आहे.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

Web Title: Rule Change From Today 1st September 2022 From Toll Tax To Lpg Cylinder Rate Pension Scheme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..